ADVERTISEMENT
भारतीय नौदलात ‘अग्निवीर’ होण्यासाठी सर्व प्रथम उमेदवार 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
10वी उत्तीर्ण उमेदवार मॅट्रिक भरतीसाठी (MR) आणि 12वी उत्तीर्ण सीनियर सेकेंडरी भरती (SSR) पदासाठी अर्ज करू शकतात.
भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर अग्निवीर SSR आणि MR भरती अधिसूचना जारी झाली आहे.
जाहिरातीनुसार, अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in या पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
अर्जाच्या वेळी मार्कशीट, डोमेसाइल प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आवश्यक आहे.
अर्जदार उमेदवाराचे वय केवळ साडे सतरा वर्षे ते 21 वर्षे असावे.
भारतीय नौदलातील अग्निवीर भरती प्रक्रियेचे तीन टप्पे असतात. प्रथम लेखी, शारीरिक फिटनेस आणि वैद्यकीय चाचणी आहे.
अग्निवीर SSR भरती चाचणी 60 मिनिटांची असेल ज्यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांचे प्रश्न असतील.
अग्निवीर एमआर भरती चाचणी ३० मिनिटांची असेल आणि त्यात विज्ञान आणि गणित आणि १०वी स्तरावरील सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतील.
ADVERTISEMENT