महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांपासून केंद्रस्थानी असलेले नेते म्हणजे शरद पवार. शरद पवारांनी कायमच बेरजेचं राजकारण केलं आहे. ते पंतप्रधान होतील अशाही चर्चा अनेकदा रंगायच्या. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. अशात आता देशाचे माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेते मोरारजी देसाई यांचं उदाहरण देत शरद पवार यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे. शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणुका लढणार?; राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार काय म्हणाले?
मोरारजींचं उदाहरण देऊन नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार?
मोरारजी देसाईंचं उदाहरण देत शरद पवार म्हणाले की मी आता कोणत्याही प्रकारची सत्तेची जबाबदारी घेणार नाही. माझं वय ८२ आहे. मोरारजी देसाई भाग्यवान होते. वयाच्या ८२ व्या वर्षी ते पंतप्रधान झाले. मोरारजींचा कित्ता मी काही चालवू इच्छित नाही असं म्हणत आपण आता पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाही हे शरद पवार यांनी सांगून टाकलं आहे. शरद पवार यांनी ठाण्यात केलेलं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.
महाविकास आघाडीचा एक यशस्वी प्रयोग महाराष्ट्रात करून दाखवल्याचा दावा शरद पवारांनी मागच्या अडीच वर्षात अनेकदा केला होता. मात्र या महाविकास आघाडीला भाजपने सुरूंग लावला. एवढंच नाही तर भाजपने त्यांचा पूर्वीचा मित्र पक्ष असलेली शिवसेनाच कशी फोडली हे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत झालेल्या भाषणात सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग अडीच वर्षांपुरता यशस्वी झाला असला तरीही तो पुढे फसला. मात्र मोदी-शाह यांना दूर ठेवण्यासाठी अर्थात भाजपला दूर ठेवण्यासाठी विरोधकांची तिसरी आघाडी बांधली जाऊ शकते अशा चर्चा राजकारणात कायम होतात.
ईडी, सीबीआय आणि आमिष देऊन सरकारं पाडणं हेच सूत्र; मोदी सरकारबद्दल शरद पवार काय म्हणाले?
मोदी शाह यांना बाजूला सारण्यासाठी विरोधकांची तिसरी आघाडी झाली तर त्याचं नेतृत्व शरद पवारांनी करावं अशाही चर्चा राज्यात अनेकदा होत असतात. तसंच देशपातळीवरही होत असतात. मात्र आपण या संदर्भात आता सत्तेची कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मोरारजी देसाई यांचं उदाहरण देऊन शरद पवारांनी हे भाष्य केलं आहे. या देशातल्या सामान्य लोकांच्या यातना, समस्या सोडवण्यासाठी विविध राजकीय विचारांच्या लोकांना हातभार लावावा हे सूत्र माझं आहे. मी आता सत्तेची जबाबदारी घेणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडीबाबत काय म्हणाले शरद पवार?
येणाऱ्या काळात ज्या निवडणुका येतील त्यांना एकत्रितपणे सामोरं जावं की स्वतंत्र लढावं याबाबत आम्ही विचारविनिमय आणि चर्चा करत आहोत. आमच्या पक्षातही विचार सुरू आहे पण ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. असं असलं तरीही माझं व्यक्तिगत मत असं आहे की देशात लोकांना जर पर्याय द्यायचा असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे.
ADVERTISEMENT