महाराष्ट्रात काय सुरू काय बंद

मुंबई तक

• 10:24 AM • 12 Mar 2021

मुंबई तकः राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 शहरांपैकी 8 शहर महाराष्ट्रात आहेत. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आवश्यक ते निर्बंध त्यांच्या भागातील गरजेनुसार लादले आहेत. ते कुठे आणि […]

Mumbaitak
follow google news

मुंबई तकः राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 शहरांपैकी 8 शहर महाराष्ट्रात आहेत. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आवश्यक ते निर्बंध त्यांच्या भागातील गरजेनुसार लादले आहेत.

हे वाचलं का?

ते कुठे आणि कसे निर्बंध लादले आहेत याबद्दल सामान्यांसाठी ही माहिती

पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी आज पुण्यात लॉकडाउन होणार का या प्रश्नाला पुण्यात रात्रीची संचारबंदी जाहीर करुन उत्तर दिलं आहे. तर आजच अकोल्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकळापर्यंत लॉकडाउन जाहीर केलं आहे.

पुणे :

– पुण्यात सध्या रात्री 11 ते सकाळी सहा पर्यंत संचारबंदी

– 31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालये बंद

– स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अध्ययन वाटीका 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

– ह़ॉटेल आणि बार रात्री 11 नंतर सकाळी 6 पर्यंत बंद राहणार

– लग्न समारंभ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध

– पुण्यात चोवीस तासात 2035 रुग्ण आढळले

– 21 हजार 276 कोरोनाचे अक्टिव्ह रुग्ण आहेत

नागपूर

– खासगी कार्यालय, मद्यविक्री दुकानं बंद

– अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद

– ऑनलाईन मद्यविक्री, घरपोच मद्य मिळणार

तर पुढील गोष्टी सुरू राहणार

– तर बँक, पोस्ट, भाजीपाला, अंडी, मांस, मच्छी, चष्माच्यी दुकानं

– उद्योग

– शासकीय कार्यालय 25 टक्के उपस्थितीने सुरू राहणार

– लसीकरण मोहीम सुरू राहणार

– वैद्यकीय आणि पॅरामेडिकल सेवा सुरु राहणार

नाशिक

9 मार्चपासून अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

– नाशिकमध्ये सर्व व्यवहार सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत सुरु असणार

– रात्री 7 वाजेनंतर निर्बंध असणार

– 25-30 ते लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– 4 तालुक्यातील शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– 15 मार्चनंतर लग्नसोहळ्यास मंगल कार्यालयात परवानगी नसेल.

– पालकमंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

– जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव येथे सर्व शाळा आणि क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद

– नाशिक, नांदगाव, मालेगाव, निफाड या 4 तालुक्यातील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद

– दरम्यान, यावेळी जीवनावश्यक वस्तू दुकाने / सेवा वगळता इतर सर्व दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत चालू असणार

– बार, हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी

– जिम, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर फक्त व्यक्तिगत वापरासाठी परवानगी

– सर्व धार्मिक स्थळं सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले राहील. मात्र शनिवार, रविवार पूर्णपणे बंद राहतील.

– गर्दी होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना बंदी

– भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार.

औरंगाबाद

– 11 मार्चपासन 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉरडाउनॉ

– शनिवार रविवार पूर्णतः लॉकडाउन

– सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सर्वसामान्य व्यवहार सुरू राहतील

– राजकीय, सामाजिक सभा, धार्मिक स्थळ, कार्यक्रम आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा महाविद्यालया बंद असणार

उस्मानाबादमध्ये

– जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू

– आठवडी बाजार बंद राहणार

– दर रविवारी जनता कर्फ्यू असणार.

– जनता कर्फ्यूच्या दिवशी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापने बंद राहणार आहेत.

– धार्मिक व प्रार्थना स्थळे, मंदिरे देखील दर रविवारी बंद राहणार.

– धार्मिक विधींसाठी केवळ 5 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी

– या ठिकाणी नो मास्क नो एन्ट्री हा नियम लागू असणार आहे.

– जिम, क्रीडांगणे, व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील

– मोठ्या स्पर्धा घेण्यावर बंदी असणार.

– सभा, मोर्चे, उपोषण, आंदोलन यांना बंदी

– सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स हे देखील बंद राहतील.

– तसेच लागू असून विनाकारण रात्रीच्या प्रवासावर बंदी असणार आहे.

अकोला

अकोल्याबाबत आजच निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

– 12 मार्च शुक्रवारी रात्री 8 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत लॉकडाउन

जळगाव

जनता कर्फ्यू काल आज शुक्रवारी रात्रीपासून सोमवापर्यंत

    follow whatsapp