मुंबई तक: पुजा चव्हाण प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वारंवार उल्लेख झालेले संजय राठोड यांच्याबाबत शिवसेनेला विरोधी पक्षाकडून खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. पूजा चव्हाण प्रकरणात सरकार काही भूमिका घेत नाही असं कसं बोलता असा सवाल राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. मुख्यमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असंही राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
संजय राठोड प्रकरणाबाबत सरकारकडून काहीच पावलं उचलली जात नसल्याबाबत राऊत यांना माध्यमांनी छेडलं. तेव्हा सरकार काहीच भूमिक घेत नाही असं कसं बोलता असा प्रश्न त्यांनी केला. यावर बोलताना ते म्हणाले काल गृहमंत्री अनिल देशमूख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे प्रमूख आहेत. त्यांनी देखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तेव्हा सरकार या प्रकरणात काही भूमिका घेत नाही असं कसं बोलता असं राऊत म्हणाले. राजीनाम्याबद्दल त्यांनी काही माहित नसल्याचं राऊत यांनी सांगितलं.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे विरोधकानी मागणी केली आहे. तसंच शिवसेनेतील एका गटानेही या प्रकरणात शिवसेनेची बदनामी होत असल्याबाबात नाराजी व्यक्त केली आणि राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
कोण आहेत संजय राठोड?
संजय राठोड हे शिवसेनेचा एक चेहरा म्हणूनही ते ओळखले जातात. महाविकास आघाडीच्या आधी म्हणजेच 2014 च्या फडणवीस सरकारच्या काळातही त्यांच्यावर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेनं त्यांनी काम करण्याची संधी दिली होती. पण त्यांची, त्यांच्या मंत्रीपदाची याआधी फारशी चर्चा झाली नाही.
संजय राठोड हे शिवसेनेचे राज्यातले नेते म्हणून जसं ओळखले जातात, तसंच शिवसेनेचा विदर्भातला एक महत्त्वाचा, चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. ठाकरे घराण्याशी त्यांचं चांगले संबंध आहेत.
ADVERTISEMENT