तारखा लक्षात ठेवा! ऑक्टोबरमध्ये चार चित्रपट आणि वेबसीरिज होतेय प्रदर्शित

मुंबई तक

• 04:08 AM • 01 Oct 2021

कोरोना आणि लॉकडाउनच्या निर्बंधामुळे चित्रपटगृहं बंद असली, तरी मनोरंजन मात्र थांबलेलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मला सरावलेल्या सिनेरसिकांच्या भेटीसाठी ऑक्टोबरमध्ये चार चर्चित चित्रपट प्रदर्शित होतं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री राधिका मदन आणि अभिनेता विद्युत जामवाल या चार कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होत आहे. रश्मी रॉकेट… अभिनेत्री तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेला रश्मी रॉकेट सिनेमा […]

Mumbaitak
follow google news

कोरोना आणि लॉकडाउनच्या निर्बंधामुळे चित्रपटगृहं बंद असली, तरी मनोरंजन मात्र थांबलेलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मला सरावलेल्या सिनेरसिकांच्या भेटीसाठी ऑक्टोबरमध्ये चार चर्चित चित्रपट प्रदर्शित होतं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री राधिका मदन आणि अभिनेता विद्युत जामवाल या चार कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होत आहे.

हे वाचलं का?

रश्मी रॉकेट…

अभिनेत्री तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेला रश्मी रॉकेट सिनेमा १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आकर्ष खुराणाने या सिनेमाचं दिग्दर्शन असून, एका महिला धावपटूचा संघर्ष सिनेमातून मांडण्यात आलेला आहे.

सरदार उधम

सरदार उधम सिंग यांच्या आयुष्यावरील सरदार उधम सिनेमाची सगळ्यानाच उत्सुकता लागली आहे. सिनेमाचा ट्रेलर जबरदस्त असून, अभिनेता विकी कौशल सरदार उधम सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा १६ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

शिद्दत : जर्नी बियाँड लव

अभिनेत्री राधिका मदन, अभिनेता सनी कौशल, मोहित रैना आणि डायना पेंटी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘शिद्दत : जर्नी बियाँड लव’ हा सिनेमाही ऑक्टोबरमध्ये रिलीज होत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर १ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होत असून, कुणाल देशमुखने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सनक : होप अंडर सीज

अभिनेता विद्युत जामवालची प्रमुख भूमिका असलेला ‘सनक : होप अंडर सीज’ हा सिनेमा विजयादशमीला रिलीज होतं आहे. १५ ऑक्टोबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सनक प्रदर्शित होणार आहे. अॅक्शनपट असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन कनिष्क वर्मा याने केलं आहे. या सिनेमात अभिनेत्री नेहा धुपिया आणि चंदन रॉय सन्यालही दिसणार आहेत.

लिटल थिग्स सीझन 4

ऑक्टोबरमध्ये चार सिनेमाच्या लाईनमध्ये लोकप्रिय ठरलेली ‘लिटल थिग्स’ वेबसीरिजचा चौथा सीझन रिलीज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय ठरलेली जोडी अभिनेत्री मिथिला पालकर आणि ध्रुव सेहगल यांची केमिस्ट्री चौथ्या सीझनमध्ये बघायला मिळणार आहे. 15 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर लिटल थिग्सचा सीझन 4 बघता येणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय ठरलेल्या लिटल थिग्स चौथा आणि अखेरचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. चौथ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चौथ्या सीझनमध्येही ध्रुव व काव्यामधील रोमांन्स, भांडण आणि रिलेशनशिपमधील चढउतार बघायला मिळणार आहेत.

    follow whatsapp