मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव आहे. कारण शिवसेनेत बंड पुकारत थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदारांनी वेगळा गट तयार केला. त्यानंतर शिवसेना दुभंगली. भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी गणपतीच्या निमित्ताने उपस्थिती दर्शवली. एबीपी माझाला दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत उद्धव ठाकरेंना सोडण्याचा निर्णय कसा घेतला ते त्यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?
२०१९ ला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यानंतर जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तोच आम्हाला मान्य नव्हता. त्यावेळी पक्षाचा आदेश म्हणून ते मान्य केलं. आम्ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे कार्यकर्ते. नेतृत्वाचा निर्णय झाला म्हणून आम्ही काम करू लागलो. पण खूप आमदारांची महाविकास आघाडीला मान्यता नव्हती.
एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार?; दीपक केसरकरांनी केला खुलासा
शिवसैनिकांना त्रास दिला जात होता
शिवसैनिकांना त्रास होतो आहे, त्यांचं खच्चीकरण केलं जातं आहे. आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आमच्याच घटकपक्षातले लोक कार्यक्रम करत होते. भूमिपूजन करत होते. तसंच बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका यांची गळचेपी होत होती. सरकारची ध्येयधोरणं वगैरे सगळंच लादलं जातं आहे हे जाणवत होतं.
२०१९ ला बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचे फोटो लावूनच निवडणुकीला सामोरे गेलो. जनतेने युतीलाच कौल दिला होता. पण समीकरण बदललं, दुसरं गणित झालं ते आम्ही दुरूस्त केलं. ट्रिगर पॉईंट विचाराल तर रोज सुरू होतं. ट्रिगर रोजच दाबला जात होता. गोळी सुटल्यानंतर कुणी तरी शहीद होत होतं. जे झालेले ५० लोकंच माझ्या मागे लागले होते.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले…
आदित्य ठाकरेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका
खोके सरकार अशी टीका तुमच्यावर होते त्याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता जे बोलतात त्यांना तो अधिकार आहे? जे ५० लोकं आहेत त्यातले अनेकजण २५-३०, ४० वर्षे काम केलं आहे. जे आमच्यावर टीका करतात त्यांना किती अनुभव आहे?असाही प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही ही लढाई लढलो. खोक्याबिक्यांबाबत बोलणारे कोण आहेत? मी त्यात आता पडत नाही. असाही टोला आदित्य ठाकरेंना लगावला.
आज जनता खुश आहे, २०१९ ला जे व्हायला हवं होतं ते आम्ही आत्ता केलं कारण मधे कोविड होता. मतदारांनी युतीला कौल दिला होता. जनमत युतीच्या बाजूने होतं. त्यामुळे नवा प्रयोग करताना आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे आम्ही जो प्रयोग केला ती दुरूस्ती केली. त्यामुळे जनता आणि लोक खूप खुश आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मी मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून हा जो काही कार्यक्रम केला आहे तो केलेला नाही असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT