जितेंद्र नवलानीची चौकशी कोण करतं आहे? जितेंद्र नवलानीवर SIT कुणाची आहे? जितेंद्र नवलानीवर FIR कुणाचा? उद्धव ठाकरे याचं उत्तर देणार का ? असे प्रश्न आज झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने बॉम्बे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्याआधी उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अनेकांवर आरोप केले. जितेंद्र नवलानी, चार ईडी ऑफिसर, किरीट सोमय्या, १५ हजार कोटीचा घोटाळा. पंतप्रधानांना पत्रही लिहिण्यात आलं. ठाकरे सरकारच्या डझनभर मंत्र्यांनी टीव्हीवर मुलाखती दिल्या. EOW ने SIT बनवली आहे असं सांगितलं.
महिनाभर पेड जाहिराती देऊन झाल्या. ६८ लोकांची चौकशी करणार अशी यादी बनवली. एसआयटीने १७ लोकांची चौकशी केली. नंतर ४२ लोकांची चौकशी केली. आता पुढे काय झालं? EOW ने जितेंद्र नवलानीशी संदर्भात ज्या चौकश्या केल्या त्याचं पुढे काय झालं? त्याला डोनेशन दिलं, ब्राईब दिलं अशा सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या आता त्या SIT चं काय झालं आहे. ही SIT विसर्जित झाली हे संजय पांडे मान्य करणार का असंही किरीट सोमय्यांनी विचारलं आहे.
संजय पांडे हे कबूल करणार का? की EOW ला हा तपास बंद करायला सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत उत्तर द्यायला पाहिजे. संजय राऊतांबाबत मला सांगू नका. संजय राऊत म्हणजे सरकार नाही. संजय राऊत हे प्रवक्ते आहेत. उद्धव ठाकरेंनी सेटिंग करण्यासाठी हे सगळं नाटक केलं का? कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. मला जी माहिती मिळाली त्यानुसार एकाच गुन्ह्यावर दोन एसआयटी. दोन एजन्सीज, दोन एफआयआर हे असं कसं? एकाच बाजूला EOW एका बाजूला दुसरी एजन्सी हे तुम्ही लावलं काय आहे? EOW ची एसआयटी पण त्याच १५ पानी पत्रावर चौकशी करते आहे हे खरं आहे का? ACB ची एसआयटीही त्याच विषयावर तपास करते आहे.
उद्धव ठाकरेंना हे माहित नाही का? की एकाच विषयावर दोन FIR झाले तर ते दोन्ही एफआयआर रद्द होणार. मला संजय राऊत यांच्याशी काहीही घेणं देणं नाही कारण इश्यू डायव्हर्ट करण्याचं काम त्यांना देण्यात आलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे EOW च्या एसआयटीला ६७ लोकांच्या जबाबात काहीही सापडलं नाही. त्यामुळे EOW ला जितेंद्र नवलानी प्रकरण चौकशी थांबवायला सांगितलं आहे. FIR करायची नाही असं सांगितलं आहे असंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या प्रकरणी चौकशी करायला पाहिजे अशीही मागणी किरीट सोमय्यांनी केली.
ADVERTISEMENT