सांगा वसंत कुणी हा पाहिला? पुणे मनसे कार्यालयावरच्या शुकशुकाटानंतर एकच चर्चा

मुंबई तक

04 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:49 AM)

मशिदींवरचे भोंगे काढले नाही तर त्यांच्यासमोर 4 तारखेपासून दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्याचे पडसाद आज नाशिक, जळगाव, ठाणे या ठिकाणी पाहण्यासही मिळाले. एवढंच नाही तर आज सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांतर्फे आज सकाळपासूनच धरपकड सुरू झाली आहे. अशात पुण्यात वसंत मोरे कुठे आहेत याची चर्चा रंगली […]

Mumbaitak
follow google news

मशिदींवरचे भोंगे काढले नाही तर त्यांच्यासमोर 4 तारखेपासून दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्याचे पडसाद आज नाशिक, जळगाव, ठाणे या ठिकाणी पाहण्यासही मिळाले. एवढंच नाही तर आज सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांतर्फे आज सकाळपासूनच धरपकड सुरू झाली आहे. अशात पुण्यात वसंत मोरे कुठे आहेत याची चर्चा रंगली आहे.

हे वाचलं का?

MNS: राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले ‘जय श्रीराम!’

एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक वसंत मोरे उर्फ तात्या यांच्या कार्यालयावर आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं एरवी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरलेल्या या परिसरात सध्या शुकशुकाट आहे.

काही तासांपूर्वीच वसंता मोरे हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह देवदर्शनासाठी तिरुपतीला बालाजीला गेले असल्याची खात्रीलायक माहिती त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. तसंच ही माहिती स्थानिक पोलिसांकडे हे उपलब्ध असल्याने त्यांनी कुठल्याही प्रकारची नोटीस तात्या किंवा त्यांच्या सोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांची नावेही बजावलेली नाहीत असंही समजतं आहे.

काय आहे प्रकरण?

वसंत मोरे यांनी प्रसार माध्यमा समोर उघडउघड नाराजी व्यक्त केली. या नाराजीची किंमत वसंत मोरे यांना मोजावी लागली. त्यावर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून बाजूला करीत साईनाथ बाबर यांना शहर अध्यक्षपदी निवड केली.

त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर राजकारण घडत असताना.दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे या बाबत पुन्हा एकदा सवाल उपस्थित करीत भोंगे खाली घेतले जावे,अन्यथा हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर राज ठाकरे यांनी दिलेली मुदत संपताच,आज सकाळपासून राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यातील अजय शिंदे आणि हेमंत संभूस यांना पोलिसानी ताब्यात घेतले.पण यामध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत.

त्या दोघांनी देखील फोन स्विच ऑफ करून ठेवले आहेत.या दोघांचे फोन स्विच ऑफ असल्याने,राज ठाकरे यांची भूमिका या दोघांना मान्य नाही का असे म्हणावे लागले.आता यावर दोघे समोर येऊन काय भूमिका मांडतात,हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp