श्रावण महिना सुरु झाला की अनेक जणांना माळरानावर उगवणाऱ्या रानभाज्यांचे वेध लागतात. अंबरनाथ तालुक्यात काकडवाल आणि कुंभार्ली गावातील माळरानावर या दिवसांमध्ये ९ आरी भेंडीचं उत्पादन घेतलं जातं. सर्वसाधारणपणे बाजारात मिळणाऱ्या भेंडीच्या तुलनेत या भेंडीला पांढरी झलक असते. चवीला देखील ही भेंडी वेगळी असल्यामुळे या दिवसांमध्ये पांढऱ्या भेंडीला जास्त मागणी असते.
ADVERTISEMENT
या भेंडीने सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनाही मागे टाकलं असून स्थानिक बाजारात ही भेंडी १२० ते १४० रुपये किलो दराने विकली जात आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे माळरानांवर विविध फळभाज्यांचे उत्पादन हे घेतले जाते. प्रामुख्याने पावसाळ्यात पाणी अधिक असल्याने भेंडी, पडवळ, शिरोळे यांचे उत्पादन हे सर्वाधिक घेतले जात असते. मात्र यंदा या सर्व भाज्यांमध्ये सफेद भेंडीचा बाजारात दर हा सर्वाधिक वधारलेला दिसून आला आहे. बाजारात शेतकऱ्यांकडून प्रति किलो हि सफेद भेंडी १२० ते १४० रुपये दराने विकत घेतली जात आहे. त्यामुळे यंदा सफेद भेंडी लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी कोरोना महामारी नंतर अच्छे दिन आले आहेत. भेंडी ही भाजी आयुर्वैदीक असल्याने अनेक जण हे भेंड्याच्या भाजीला पावसाळ्यात आपल्या ताटात अधिक महत्व देत असतात. बाजारात आलेली पांढरी भेंडी औषधासाठी चांगली असते.
पोट साफ करण्यासाठी पांढऱ्या भेंडीचा वापर केला जातो, म्हणून या दिवसांमध्ये भेंडीला चांगली मागणी असते. परंतू फार कमी ठिकाणी ही भेंडी पिकवली जात असल्यामुळे यंदा बाजारात या भेंडीचे दर चांगलेच तेजीत आहेत. एकीकडे इतर भाज्यांसाठी शेतकऱ्यांना तुटपुंजै पैसे मिळत असताना पांढऱ्या भेंडीच्या दरांनी शंभरी गाठल्यामुळे स्थानिक शेतकख्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT