आयकर विभागाची छापेमारी झालेले राहुल कनाल कोण?

मुंबई तक

• 11:18 AM • 08 Mar 2022

मुंबई: राजकारणात टाईमिंग हे महत्वाचे असतं आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींच टायमिंग हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेच्या आधीच इनकम टँक्स विभागाने राहुल कनाल यांच्या मुंबईतल्या वांद्रे येथील घरावर धाडी टाकल्या आहेत. या धाडसत्राच्या वेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्या राहुल कनाल यांच्य़ा मुंबईतल्या घरी इनकम टँक्स विभागाने छापेमारी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राजकारणात टाईमिंग हे महत्वाचे असतं आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींच टायमिंग हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेच्या आधीच इनकम टँक्स विभागाने राहुल कनाल यांच्या मुंबईतल्या वांद्रे येथील घरावर धाडी टाकल्या आहेत. या धाडसत्राच्या वेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

हे वाचलं का?

ज्या राहुल कनाल यांच्य़ा मुंबईतल्या घरी इनकम टँक्स विभागाने छापेमारी केली ते राहुल कनाल ते आदित्य ठाकरेंच्या अत्य़ंत जवळच्या गोटातले मानले जातात. शिवसेनेची जी युवा सेना आहे त्या युवा सेनेच्या कोअऱ कमिटीत राहुल कनाल आहेत. 2019 च्या वेळेस आदित्य ठाकरेंसाठी एक टीम तय़ार करण्य़ात आली होती त्या टीमचे राहुल कनाल हे सदस्य आहेत. व्यवसायाने राहुल कनाल हे एक उदयोजक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय नगर जिल्हातल्या शिर्डी संस्थानाच्या विश्वस्तपदावर राहुल कनाल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबईच्या महानगरपालिकेतल्या शिक्षण समितीचे राहुल कनाल हे सदस्य़ होते. ते मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. राज्य़पालांकडे जी 12 आमदारांची नावं दिली होती त्यात राहुल कनाल यांच नाव असल्य़ाची चर्ची होती.

राहुल कनाल यांचे वडील हे डेंटिंस्ट आहेत. राहुल कनाल यांच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरुन जी माहिती मिळते त्यावरुन राहुल कनाल यांची बॉलीवूडमध्येही जानपेहचान असल्याची माहिती आहे.

सलमान खानपासून अनेक अभिनेत्यांसोबत राहुल कनाल यांची उठबस होती. संजय दत्त, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासोबतचे फोटो फेसबुकवर आहेत. याशिवाय उद्धव ठाकरें, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसोबत त्य़ांचे फोटो आहेत. त्यामुऴे राहुल कनाल हे मातोश्रीच्या जवळचे होते या पुष्टी मिळते.

आता या धाडीत काय सापडतं? हे आगामी काळात कळेलच पण आधी उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जाणारे यशवंत जाधव आणि आता आदित्य ठाकरेंच्य़ा जवळचे मानले जाणारे राहुल कनाल यांच्यावर धाडी पडल्य़ामुळे आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिय़ा उमटणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp