बाळासाहेबांना बदनाम करण्यासाठी कुणाचा वापर केला? मोदींनी काँग्रेसची राज्यसभेत पिसं काढली..

मुंबई तक

• 09:02 AM • 08 Feb 2022

काँग्रेसमुळेच देशात लोकशाही आहे असं वक्तव्य संसदेत करण्यात आलं. त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतल्या भाषणात घेतला. काँग्रेसच्या सत्ता काळात त्यांनी कोणत्या पक्षांना कसा त्रास दिला याचा पाढाच मोदींनी राज्यसभेतल्या भाषणात वाचला. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंना बदनाम कुणी केलं? असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. लोकशाहीच्या मुद्द्यावरून […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेसमुळेच देशात लोकशाही आहे असं वक्तव्य संसदेत करण्यात आलं. त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतल्या भाषणात घेतला. काँग्रेसच्या सत्ता काळात त्यांनी कोणत्या पक्षांना कसा त्रास दिला याचा पाढाच मोदींनी राज्यसभेतल्या भाषणात वाचला. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंना बदनाम कुणी केलं? असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

लोकशाहीच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसची अक्षरश: पिसे काढली. काँग्रेसच्या हायकमांडची नीती तीन प्रकारची आहे. एक म्हणजे डिस्क्रेडिट करा. दुसरी डीस्टॅबलाईज्ड करा, तिसरी म्हणजे डिसमिस करा. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा हे काँग्रेस हायकमांडचं धोरण राहिलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते आता लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत-मोदी

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

फारुख अब्दुलांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी देवीलाल यांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी चरणसिंगची सरकार कुणी अस्थिर केलं होतं? पंजाबमध्ये सरदार बादलसिंग यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला होता? कर्नाटकात हेगडेंचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? 50 वर्षापूर्वी डाव्यांचं सरकार कुणी पाडलं होतं? एमजीआरचं सरकार कुणी डिसमिस केलं होतं?

आंध्रमध्ये एनटीआरचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? केंद्र सरकारचं ऐकत नाही म्हणून मुलायम सिंह यादव यांना कोणत्या पक्षाने त्रास दिला होता? असा सवालच मोदींनी केला. ज्या आंध्रप्रदेशने सरकार बनवण्यासाठी मदत केली त्यांच्यासोबत काय केलं. आंध्रचं विभाजन केलं. विभाजन करताना माईक बंद केले. चर्चाही केली नाही. ही लोकशाही होती का? ही पद्धत योग्य होती का? असा सवाल मोदींनी केला.

आणखी काय म्हणाले नरेंद्र मोदी?

1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते आता लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत असा सणसणीत टोला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर घणाघाती प्रहार केला आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबाकडे पक्षाची जबाबदारी जाते आणि परिवारवादी पक्ष होतो तेव्हा सर्वात आधी टॅलेंटची हत्या होते असंही मोदींनी म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना काँग्रेसवर नरेंद्र मोदींनी एकामागोमाग एक प्रहार केला आहे. त्यामुळे राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला.

    follow whatsapp