Mumbai Police: विवेक फणसळकरांचं पद मोठं की देवेन भारतींचं?

मुंबई तक

06 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

Vivek Phansalkar Vs Deven Bharti: मुंबई: मुंबई पोलीस दलात (Mumbai Police Force) दोनच दिवसांपूर्वी ‘विशेष पोलीस आयुक्त’ (Special Police Commissioner) हे पद तयार करुन त्या पदावर आयपीएस अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण याच नियुक्तीनंतर मुंबई पोलीस आयुक्तांच्या पदाचं काय किंवा हे पद मोठं की देवेन भारतींचं पद मोठं […]

Mumbaitak
follow google news

Vivek Phansalkar Vs Deven Bharti: मुंबई: मुंबई पोलीस दलात (Mumbai Police Force) दोनच दिवसांपूर्वी ‘विशेष पोलीस आयुक्त’ (Special Police Commissioner) हे पद तयार करुन त्या पदावर आयपीएस अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण याच नियुक्तीनंतर मुंबई पोलीस आयुक्तांच्या पदाचं काय किंवा हे पद मोठं की देवेन भारतींचं पद मोठं अशी जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. (who will have a bigger position in mumbai police force vivek phansalkar or deven bhartis)

हे वाचलं का?

यातच देवेन भारती यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) यांची भेट घेतल्यानंतर एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी मुंबई पोलीस ही एक टीम आहे. इथे कोणीही सिंघम नाही. असं ट्विट करत फणसळकरांना एक प्रकारे टोलाच लगावला होता. त्यामुळे आता मुंबई पोलीस दलात नेमकं पद कोणाचं मोठं असा चर्चेचा विषय सुरु झाला आहे.

आता याबाबतच आम्ही तुम्हाला नेमकी माहिती देणार आहोत.

मुंबई पोलीस दलात करण्यात आलेला हा महत्त्वाचा ऐतिहासिक अशा स्वरुपाचाच आहे. कारण याआधी मुंबई पोलीस दलात असं पदच नव्हतं. ते खास तयार करुन त्या जागी देवेन भारती यांची वर्णी लावण्यात आली आहे. यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. कारण देवेन भारती हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी मर्जीतले नेते समजले जातात. त्यामुळे जेव्हा त्यांना या पदाबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी नेमकं स्पष्टीकरण दिलं.

Mumbai Police दलातील ऐतिहासिक नियुक्ती, देवेन भारतींवर मोठी जबाबदारी

पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले:

‘साधारणपणे पूर्वी सीपीचं पद हे ADG चं पद होतं. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर ते पद मी DG लेव्हलचं केलं. त्यामुळे साधारणपणे आपल्या श्रेणी पदक्रमामध्ये सह पोलीस आयुक्त जे असतात ते IG लेव्हलचे असतात. IG लेव्हलच्या अधिकाऱ्याने DG लेव्हलच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट केलं पाहिजे. ADG लेव्हलच्या ऑफिसरने DG लेव्हलच्या ऑफिसरला रिपोर्ट केलं पाहिजे.’

‘मात्र, मुंबईची सगळी व्याप्ती पाहता तिथलं पद आपण DG लेव्हलचं केलं. पण मध्ये आपण ADG लेव्हलचं पद तयार करु शकलो नव्हतो. काही कारणाने ते राहिलं होतं. त्यामुळे आता ADG लेव्हलचं पद निर्माण केलं आहे. हे पद त्याला नाव जरी विशेष पोलीस आयुक्त असं असलं तरीही मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अधीनच हे पद आहे. त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करायचं आहे.’

‘जे काही IG लेव्हलचे सहआयुक्त आहेत त्यांना ADG लेव्हलच्या विशेष पोलीस आयुक्तांना त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. त्यामुळे खूप काही वेगळं केलंय वैगरे असं मला बिल्कूल वाटत नाही. एक जी मिसिंग लिंक होती ती आपण याठिकाणी कॅरीआऊट केली आहे.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

‘सिंघम’वरुन मुंबई पोलिसात नवं राजकारण, देवेन भारतींनी स्पष्ट केले इरादे

गृह विभागाने जारी केलेला नेमका शासन निर्णय काय?

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखाली पोलीस सह आयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करता यावे म्हणून त्यांच्या अधीन ‘विशेष पोलीस आयुक्त’ हे ‘अपर पोलीस महासंचालक’ दर्जाचे पद सुपूर्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुसार शासनाने निर्णय घेतला आहे.

प्रशासकीय निकड म्हणून पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाली पोलीस सह आयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी, ‘अपर पोलीस महासंचालक’ दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. यांच्या आस्थापनेवरील ‘संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी’ हे अपर पोलीस महासंचालक’ दर्जाचे पद, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या आस्थापनेवर वर्ग कदरण्यास मान्यता देण्यात येत आहे. या पदाचे नामाभिधान ‘विशेष पोलीस आयुक्त’ असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखाली सर्व पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करतील. असं गृहविभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटलं आहे.

याचाच अर्थ तांत्रिकदृष्ट्या देवेन भारती यांचं पद हे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यापेक्षा कमी दर्जाचं आहे. मात्र, असं असलं तरीही राजकीय दृष्ट्या मुंबई पोलीस दलात देवेन भारती आणि विवेक फणसळकर या दोन आयपीएस अधिकाऱ्यांपैकीा नेमका कोणाचा दबदबा राहणार हे आपल्याला येत्या काळातच समजेल.

    follow whatsapp