WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेत चीफ सायंटिस्ट या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी इंडिया टुडेशी चर्चा करताना आपण भारतातील कोरोनाबाबत खूप चिंतित असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. इतर काही देशांमध्येही कोरोनाचं संकट गहिरं आहे. व्हायरसचे नवे प्रकार समोर येत आहेत. या व्हायरसने स्वतःला का बदललं आहे? ते बदल नेमके काय आहेत ? याचा आम्ही अभ्यास करत आहोत. जगभरातल्या काही देशांमध्ये व्हायरसचा पॅटर्न वेगळा आहे तिथे तो हळू हळू पसरतो आहे. भारतातल्या सुपर स्प्रेडर इव्हेंट्सबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्या म्हणाल्या..
ADVERTISEMENT
चीनचं जैविक शस्त्र आहे कोरोना? हाती आलेल्या गुप्त माहितीनुसार अमेरिकेने केला दावा..
दुसऱ्या लाटेत कोरोना हा भारतात झपाट्याने पसरतो आहे ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. जे लोक इनडोअर आहेत म्हणजेच आपल्या घरात आहेत ते सुरक्षित आहेत. मात्र जर लोक हजारोंच्या संख्येने एका जागी जमा होतील, तिथे फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, मास्क लावला गेला नाही, कोरोना प्रतिबंधाचे नियम धुडकावले गेले तर कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढणारच. भारतातही अनेक गोष्टींची खबरदारी घेतली गेली नाही. आता यापुढे प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळायचेच आहेत कारण व्हायरस नष्ट झालेला नाही.
व्हेरिएंटबाबत काय म्हणाल्या सौम्या स्वामिनाथन?
WHO ला सुरूवातीला फक्त वुहान स्ट्रेन बाबत माहिती मिळाली होती, त्यानंतर युके मध्ये एक व्हेरिएंट आढळला मग ब्राझिलमध्ये एक व्हेरिएंट असल्याची माहिती मिळाली. ब्राझिलचा व्हेरिएंट असा आहे जो अँटीबॉडीही ब्लॉक करतो. भारतात जो व्हेरिएंट आढळून आला आहे त्याच्या माहितीवरून आम्ही अभ्यास करत आहोत. सध्या जी माहिती समोर आली आहे ती चिंतेत भर घालणारी आहे. मात्र या व्हायरसचं संक्रमण रोखणं आपल्या हातात आहे. त्यासाठी संसर्गाची साखळी तोडणं आवश्यक आहे.
चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात 18 हजारांपेक्षा जास्त मृत्यू
आणखी काय म्हणाल्या स्वामिनाथन?
सध्या आम्ही डेटाद्वारे हा शोध घेत आहोत की ज्या लोकांचं लसीकरण झालं आहे त्यांच्यावर आता काय परिणाम झाला आहे? ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यावर काय परिणाम झाला आहे याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण लस घेतो, मात्र त्यानंतरही मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग यांची काळजी घ्यावी लागणार आहे. भारतात आज घडीला पॉझिटिव्हिटी रेट खूप जास्त आहे. ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व्यवस्था चांगली नाही. तिथे अँटीजेन टेस्ट करणं आवश्यक असणार आहे. पंचायत आणि सेल्फ हेल्प ग्रुप्सकी मदत घेणं आवश्यक आहे. आय़ुष्मान भारत ही एक चांगली योजना आहे अशा आणखी योजना यायला हव्यात.
भारतात कोरोना मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे, काही बाबतीत संशयही व्यक्त होतो आहे त्यामुळे मृत्यूच्या डेटावर काम करावं लागणार आहे. जुने नियम बदलायला हवे. आरोग्य सेवांना आणखी जागरूक होऊन काम करावं लागणार आहे.
सौम्या यांनी म्हटलं आहे की हवेतून कोरोना पसरतो, खोकला, शिंक यातूनही व्हायरसचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सहा फुटांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. एका खोलीत जर कोरोना झालेला एक किंवा दोन रूग्ण असतील तर दुसऱ्या खोलीत राहणाऱ्या लोकांनाही कोरोना होऊ शकतो. अशावेळी घरात मास्क घालणंही मदत करणारं ठरणार आहे. डबल मास्क वापरणंही महत्त्वाचं आहे.
‘महाराष्ट्रातील फक्त 27 टक्के कोरोना योद्ध्यांना मिळालं पंतप्रधान गरीब कल्याण विमा संरक्षण’
लसीकरणाबाबत काय म्हणाल्या सौम्य?
कोरोना प्रतिबंधाची लस आवश्यक आहेच. भारताने त्यासाठी बरीच गुंतवणूक केली आहे. भारतात 80 टक्के फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण झालं आहे. संपूर्ण लसीकरणाच्या प्रक्रियेत वेळ जाणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही वारंवार हे सांगतो आहोत की सुरक्षित राहा. भारतातल्या व्हॅक्सिनचा एफिशिअन्सी रेट 70 ते 80 टक्के आहे. भारत हा मोठा देश आहे, या देशातल्या राज्यांनीही काळजीही घेणं आवश्यक आहे. काही राज्यं चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. लॉकडाऊनबाबत काही बोलणं कठीण आहे, मात्र लॉकडाऊनचा फायदा होतो. देशात लॉकडाऊन लावयचा की नाही त्याचा निर्णय मोठ्या नेत्यांना घ्यायचा आहे. तिसऱ्या लाटेबाबतही त्यांनी शक्यता बोलून दाखवली. तसंच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर कोरोनाच्या संकटातून आपण लवकर बाहेर पडू अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT