दिवसभराच्या गोंधळानंतर फेसबुकवरील अनेकांचे कमी झालेले फॉलोअर्स पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. त्यामुळे अनेकांनी पोस्ट टाकून आनंद व्यक्त केला तर काहींनी थेट मार्क झुकरबर्गचे आभार मानले. भारतातच नव्हे तर अमेरिकेतही याचा फटका बसला होता. वेगवेगळ्या माध्यम समूहाच्या फेसबुक अकाउंटवरील फॉलोअर्स कमी झाले होते. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, द हिल अशा अनेक फेसबुक प्रोफाईलला याचा फटका बसला होता. इतकंच नाही तर मार्क झुकरबर्कचे देखील फॉलोअर्स कमी झाले होते.
ADVERTISEMENT
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जण प्रसिद्ध आहेत. कोणी आपल्या लेखनशैलीमुळे तर कोणी आपल्या वक्तृत्वामुळं. अनेक रिल्स बनवणाऱ्यांचे देखील लाखो फॉलोअर्स आहेत. तर अनेक पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तींना फेसबुकवर खूप फॉलो केलं जातं. त्यांचे फॉलोअर्स लाखात आहेत. मात्र लाखो फॉलोवर्स असलेल्या या लोकांची मंगळवारी रात्रीतून फॉलोअर्स संख्या घटून थेट 10 हजारांच्या आत आली. त्यामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त करत पोस्ट केली.
वेगवेगळे कारणं आले समोर
अनेकांचे लाखो लाखो फॉलोअर्स गायब झाल्याने त्यांना धक्का बसला होता. त्यामुळं नेमकं फॉलोवर्स कमी होण्याचं कारण काय? याबाबत चर्चा सुरु झाली होती. त्यावर अनेकांनी वेगवेगळी कारणं पुढं केली. कोण म्हणलं बग आहे. कोणी म्हणलं फेसबुकडून फेक आणि स्पॅम अकाउंट बंद करण्यात आले आहेत. पण सर्वांचे फॉलोवर्स हे 9 ते 10 हजारांच्या दरम्यान येऊन थांबले होते. त्यामुळं अनेकांनी फेसबुकची ही नवीन पॉलिसी असू शकते, असा अनुमान लावला. 10 हजारांची फॉलोअर्स मर्यादा फेसबुककडून ठरवली गेल्याच देखील कारण पुढं करण्यात आलं.
फेसबुकचा फाऊंडर मार्क झुकरबर्कचे देखील फॉलोअर्स झाले होते कमी
फॉलोअर्स कमी झाल्यामुळं अनेकांनी नाराजी सूर धरला. हे राजकारण तर नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मात्र फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याचे देखील 119 मिलियन असलेले फॉलोवर्स 9937 वर थांबले होते. त्यामुळं अनेकांनी ही फेसबुकची नवीन पॉलिसी किंवा बग असू शकतं असा अनुमान लावला. मात्र काही तासांच्या प्रतीक्षेनंतर पूर्वीप्रमाणे आहे तितके फॉलोअर्स दिसू लागले. त्यामुळं अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. फेसबुक पोस्ट टाकून फॉलोअर्स परत आल्याची माहिती या यूजर्सनी दिली आणि झुकरबर्कचे आभार देखील मानले. पण नेमकं हे फॉलोअर्स कमी का दाखवत होते, याबाबत फेसबुककडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ADVERTISEMENT