एलन मस्क भोजपुरी आणि हिंदीत ट्विट का करतोय?; अकाउंट हॅक झाल्याचीही होतेय चर्चा

मुंबई तक

• 09:50 AM • 05 Nov 2022

एलन मस्कचा ट्विटर अकाउंट हॅक झालाय का? अशी चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्याचं कारण आहे एलन मस्कच्या अकाऊंटवरून होत असलेले भोजपुरीतील ट्विट.एलन मस्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ट्विटर डील. हा करार निश्चित होताच कंपनीतून कर्मचाऱ्यांना झपाट्याने काढून टाकले जात आहे. एलन मस्क यांना ट्विटरला एक फायदेशीर कंपनी बनवायची आहे […]

Mumbaitak
follow google news

एलन मस्कचा ट्विटर अकाउंट हॅक झालाय का? अशी चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्याचं कारण आहे एलन मस्कच्या अकाऊंटवरून होत असलेले भोजपुरीतील ट्विट.एलन मस्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ट्विटर डील. हा करार निश्चित होताच कंपनीतून कर्मचाऱ्यांना झपाट्याने काढून टाकले जात आहे. एलन मस्क यांना ट्विटरला एक फायदेशीर कंपनी बनवायची आहे आणि त्यासाठी ते अनेक मोठे निर्णय घेत आहेत. मात्र, नवी चर्चा त्यांच्या ट्विटर अकाउंटबद्दल आहे.

हे वाचलं का?

एलन मस्कचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे का?

एलन मस्कचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे का असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्याच्या अकाऊंटवरून भोजपुरी आणि हिंदीमध्ये ट्विट केले जात असल्याने हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आता एलन मस्क रातोरात हिंदी आणि भोजपुरी शिकला असे नाही. आणि शिकला तर भोजपुरी गाणी का ट्विट करतोय, असा प्रश्न पडत आहे. वास्तविक हा सगळा खेळ एका ट्विटर अकाउंटवरून होत आहे.

हा सगळा गोंधळ ट्विटर युजर iawoolford मुळे

हा सगळा गोंधळ ट्विटर युजर iawoolford मुळे आहे. ज्याने प्रोफाइलमधील आपले नाव बदलून एलन मस्क असे ठेवले आहे. एवढेच नाही तर युजरने त्याचा डीपी आणि कव्हर फोटोही टाकला आहे, जो एलोन मस्कच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आहे. त्यामुळे हा संभ्रम पसरला आहे. एलोन मस्कच्या अधिकृत ट्विटर हँडलचे युजर नेम एलन मस्क आहे. तो जून 2009 मध्ये ट्विटरवर जॉईन झाला होता, तर गोंधळ पसरवणारा वापरकर्ता जानेवारी 2011 मध्ये ट्विटरवर रुजू झाला आहे.

कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले

यावरून मस्कचे अकाउंट हॅक झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोंधळाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे दोन्ही खाते व्हेरीफाईड असणं. एलन मस्क यांच्या हातात ट्विटरचे नियंत्रण आल्यापासून लोकांना कंपनीतून काढून टाकले जात आहे. शुक्रवारी कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले. ट्विटर डील होताच त्यांनी सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि पॉलिसी हेड विजया गड्डे यांना काढून टाकले. एप्रिलमध्ये सुरू झालेला हा करार ऑक्टोबरमध्ये अंतिम झाला. मस्कने ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले.

ट्विटर डील एप्रिलमध्ये सुरू झाली

मस्कने प्रथम ट्विटरमध्ये 9.2% स्टेक विकत घेतला, त्यानंतर त्याला बोर्डात सामील होण्याची ऑफर देण्यात आली. मात्र, त्याने बोर्डात रुजू होण्यास नकार दिला. प्लॅटफॉर्मवर बॉट खात्यांची संख्या जास्त आहे, असे एलन मस्क सतत सांगत होता. त्याने याबाबतचा करारही थांबवला होता, त्यानंतर ट्विटरने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वीच मस्कने हा करार अंतिम केला होता.

    follow whatsapp