नव्या संसदेतल्या अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. सोमवारी हा कार्यक्रम पार पडला. एका महाकाय अशा अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मात्र याच अशोक स्तंभामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीकेचे धनी ठरले आहेत.
ADVERTISEMENT
सोमवारी जेव्हा अशोक स्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं तेव्हा असदुद्दीन ओवेसी यांनी हे संविधानिक मापदंडांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप या पक्षांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण चालवले आहेत. आप या पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजमुद्रा बदलली आहे असा आरोप केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी हा प्रश्नही उपस्थित केला आहे की भारताची राजमुद्रा बदलणाऱ्यांना राष्ट्रविरोधी का म्हटलं जाऊ नये?
तर दुसरीकडे तृणमूलचे खासदार जवाहर सरकार यांनीही या अशोक स्तंभावर आक्षेप घेतला आहे. पूर्वीच्या अशोक स्तंभापेक्षा नव्या अशोक स्तंभात बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या राजमुद्रेचा अपमान केला आहे. नव्या संसदेत बसवण्यात आलेला अशोक स्तंभ हे अशोक स्तंभाचं मोदी व्हर्जन आहे अशीही टीका त्यांनी केली आहे.
नव्या संसदेत असलेल्या या अशोक स्तंभाची उंची २० फूट आहे. तर या अशोक स्तंभाचं वजन ९ हजार ५०० किलो आहे. या दिमाखदार अशोकस्तंभाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.
नव्या अशोकस्तंभावर (Ashoka Pillar) काय आहे आक्षेप?
नव्या अशोक स्तंभावर असलेले सिंह हे पूर्वीच्या स्तंभावरील सिंहांपेक्षा आक्रमक आणि लढण्याच्या पवित्र्यात आहेत असं दाखवण्यात आलं आहे.
राष्ट्रीय प्रतीक बदललं गेलं आहे, मोदींच्या मनाप्रमाणे हा अशोकस्तंभ घडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे
अशोकस्तंभाचं अनावरण करण्याच्या कार्यक्रमात एकाही विरोधकाला निमंत्रित करण्यात आलं नाही
राष्ट्रीय प्रतीकात बदल करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही का म्हणू नये हा प्रश्नही विरोधक विचारत आहेत
ट्विटरवरही नव्या अशोकस्तंभाची चर्चा
ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवरही नव्या अशोक स्तंभाची चर्चा चांगलीच सुरू आहे. अनेकांनी नव्या अशोक स्तंभावर आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मनाप्रमाणे आधीच्या अशोकस्तंभात बदल केले आहेत. नव्या अशोक स्तंभावर असलेले सिंह हे अधिक आक्रमक आणि खुनशी दिसत आहेत असा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशोक स्तंभाचा जो फोटो आहे तो खालून काढला आहे त्याच्यासोबत जुन्या अशोक स्तंभाचे जे फोटो ट्विट केले जात आहेत त्या दोन्हीची तुलना बरोबर नाही असं म्हटलं आहे. जर विशिष्ट उंचीवरून नव्या अशोक स्तंभाचा फोटो काढला तर जुन्यामध्ये आणि नव्यामध्ये काहीही फरक वाटणार नाही असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत उभ्या राहिलेल्या या महाकाय अशोकस्तंभाचे शिल्पकार सुनील देवरे आणि सुशील देवरे असे दोघंजण आहेत हे दोघंही महाराष्ट्रातल्या औरंगाबादचे आहेत. या अशोक स्तंभातची उंची २६ फूट आहे. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर असलेले सुनील देवधर यांनी आत्तापर्यंत अनेक शिल्प साकारली आहेत.
ADVERTISEMENT