भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी शपथ घेतली. त्या भाराताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. रविवारी म्हणजे 24 जुलै रोजी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निरोपाचे भाषण दिले. तर 25 जुलै रोजी सोमवारी मुर्मू यांनी संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधिश एन. व्ही रमणा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. मात्र, 25जुलै रोजीच राष्ट्रपतीपदाची शपथ का दिली जाते, याचा देखील एक इतिहास आहे.
ADVERTISEMENT
1977 सालापासून 10 राष्ट्रपतींनी 25 जुलै रोजी घेतली शपथ
साल 1977 सालानंतर द्रोपदी मुर्मू या दहाव्या अशा राष्ट्रपती असतील ज्यांनी 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. 25 जुलै रोजीच राष्ट्रपतींना शपथ दिली जावी, याबाबत असे काही लिखीत नियम नाहीत. मात्र, सामान्य प्रक्रियातून निवडून गेलेले राष्ट्रपतींनी या तारखेला शपथ घेतली आहे. मात्र, भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, जाकिर हुसैन आणि फखरुद्दीन अली अहमद हे अपवाद होते.
दोन राष्ट्रपतींच्या आकाली निधनाने मिडटर्म निवडणूक
भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा मान हा राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. त्यांनी 26 जनेवारी 1950 रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी 1952 साली राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून त्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यांनतर 13 मे 1962 रोजी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 13 मे 1967 पर्यंत ते देशाचे राष्ट्रपती राहिले. त्यानंतर दोन असे राष्ट्रपती जाकिर हुसैन आणि फखरुद्दीन अली अहमद हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करु शकले नाही. कारण त्यांचे निधन झाले. त्यामुळे मध्येच मिड टर्म निवडणुका लावाव्या लागल्या.
भारताच्या सहाव्या राष्ट्रपती म्हणून निलम संजीव रेड्डी यांनी शपथ घेतली ती 25 जुलै 1977 रोजी. त्यानंतरपासून आजपर्यंत म्हणजे द्रोपदी मुर्मू यांच्यापर्यंत 10 राष्ट्रपतींनी 25 जुलै रोजीच शपथ घेतली. निलम संजीव रेड्डी ,झैल सिंह, रामस्वामी वेंकरमण, शंकर दयाळ शर्मा, कोचेरिल रामन नारायणन, डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभा ताई पाटील, प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद आणि द्रोपदी मुर्मू या दहा राष्ट्रपतींनी 25 जुलै रोजी शपथ घेतली.
दरम्यान, द्रोपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विजयी मिळवला. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होत्या. मूर्मू या आदिवासी समाजातून येतात. त्यांची भारताच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती अशी देखील ओळख सांगितली जाते. तत्पूर्वी सोमवारी संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये शपथविधी सोहळ्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. शपथ घेत मुर्मू यांनी रामनाथ कोविंदकडून पदभार स्विकारले.
ADVERTISEMENT