Telangana : ‘KCR’ यांचा महाराष्ट्र प्रवेश निश्चित! संभाजीराजे छत्रपती चेहरा?

मुंबई तक

27 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:11 AM)

Will Sambhaji Raje Chhatrapati met Telangana Chief Minister ‘KCR’ नांदेड : तेलंगणातील (Telangana) सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड (Nanded) जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. […]

Mumbaitak
follow google news

Will Sambhaji Raje Chhatrapati met Telangana Chief Minister ‘KCR’

हे वाचलं का?

नांदेड : तेलंगणातील (Telangana) सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड (Nanded) जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. केसीआर यांची तेलंगणा बाहेर ही पहिलीच सभा आहे. त्या अनुषंगाने नांदेडमध्ये जागेची पाहणी करण्यात आली आहे. (Will Sambhaji Raje Chhatrapati be the face for Telangana Chief Minister ‘KCR’s Maharashtra entry?)

या सभेच्या तयारीसाठी तेलंगणाचे ४ आमदार नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. याशिवाय त्यांनी विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची भेट घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. नांदेडच्या सभेत अनेक नेते, माजी आमदार, खासदार बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाच्या या आमदारांनी केला. या सभेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.

तेलंगणाचे ‘KCR’ महाराष्ट्राच्या राजकारणात! ५ फेब्रुवारीला फुटणार नारळ

अशातच माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी (२६ डिसेंबर) मुख्यमंत्री केसीआर यांची त्यांच्या हैदराबाद येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, केसीआर यांनी संभाजीराजे छत्रपती यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. यावेळी या दोघांमध्ये तब्बल पाच तास चर्चा झाली. यात राजकीय, सामाजिक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता.

संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. ही संघटना निवडणुकीच्या राजकारणातही उतरेलं असं संभाजीराजे यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे या संघटनेच्या माध्यामातून ते राज्यात नवा राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच केसीआरही महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात उतरत आहेत. त्यांना इथे पाय रोवण्यासाठी एक सर्वपरिचित, प्रभावी आणि स्वच्छ चेहरा आवश्यक आहे. या समीकरणांमुळेच संभाजीराजे छत्रपती हे भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रातील चेहरा होणार असल्याचं बोललं जातं आहे.

Mood of the Nation : भारतात आज घडीला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत?

संभाजीराजेंकडून केसीआर यांचं तोंडभरुन कौतुक :

दरम्यान,संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत या भेटीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी केसीआर यांचं तोंड भरुन कौतुक केलं. ते म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. के. चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन आणि विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.

श्री राव यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित आणि राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या राज्यात केले आहे. श्री राव यांनी गेल्या १४ वर्षांत तेलंगणा राज्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यांचे कृषी धोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब आणि वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना आणि शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शन व आदर्शवत आहेत.

त्यांच्या या योजना आणि कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. श्री राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्यामाध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत.

त्यांनी आपल्या निवासस्थानी अगदी आपुलकीने आदरातिथ्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना पूर्ण अभ्यास असून महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरभाव जाणवला. यावेळी श्री राव यांना राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला, असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

    follow whatsapp