Maharashtra Lockdown: Unlock नंतर पुन्हा महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू होणार?

मुंबई तक

• 12:30 PM • 24 Jun 2021

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा कमी होत असल्याचं सध्या दिसत आहे. पण आता पुन्हा एकदा अशी चर्चा रंगू लागली आहे की, अनलॉकनंतर (Unlock) पुन्हा राज्यातले कोरोनाचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर (Strict restrictions) होऊ शकतात. राज्यात लसीकरणाला वेग आला आहे. पण त्याचबरोबर राज्यातल्या 21 रुग्णांमध्ये डेल्टा प्लस कोरोना रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. अडीच […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा कमी होत असल्याचं सध्या दिसत आहे. पण आता पुन्हा एकदा अशी चर्चा रंगू लागली आहे की, अनलॉकनंतर (Unlock) पुन्हा राज्यातले कोरोनाचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर (Strict restrictions) होऊ शकतात.

हे वाचलं का?

राज्यात लसीकरणाला वेग आला आहे. पण त्याचबरोबर राज्यातल्या 21 रुग्णांमध्ये डेल्टा प्लस कोरोना रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

अडीच महिन्यांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय 20 दिवसांपूर्वी घेण्यात आला. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येत सर्वात पुढे राहिला आहे. दुसऱ्या लाटेतही देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही महाराष्ट्रातच आढळून आली आहे.

एप्रिल महिन्यापासून वाढत गेलेली कोरोना रुग्णांची संख्या मे महिन्याच्या शेवटी घटताना पहायला मिळाली. 28 मे रोजी राज्यात 2 लाख 89 हजार सक्रीय रुग्ण होते. तर 23 जून रोजी राज्यात 1 लाख 21 हजार 859 सक्रीय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातला Lockdown डिसेंबरपर्यंत कायम राहणार? मुख्यमंत्र्यांचा ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ काय?

पाहा मागील आठवड्याभरात महाराष्ट्रात किती रुग्ण सापडले:

  • 23 जून- 10,066 नवे रुग्ण सापडले

  • 22 जून- 8,470 नवे रुग्ण सापडले

  • 21 जून- 6,270 नवे रुग्ण सापडले

  • 20 जून- 9361 नवे रुग्ण सापडले

  • 19 जून- 8912 नवे रुग्ण सापडले

  • 18 जून- 9798 नवे रुग्ण सापडले

  • 17 जून- 9830 नवे रुग्ण सापडले

मात्र असं असलं तरीही रुग्णसंख्या दहा हजारांच्या खाली जाताना दिसत नाही. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील याबाबत खंत व्यक्त केली आहे.

राज्यातल्या मुंबई, ठाणे, कल्याण –डोंबिलली या शहरांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. यापैकी ठाणे आणि कल्याणमधील बरेच निर्बंध हे शिथिल करण्यात आले आहेत.

राज्यातल्या 1 लाख 21 हजार 859 सक्रीय रुग्णांपैकी मुंबई, पुणे, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील 67 हजार 330 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, रायगड या 5 जिल्ह्यांमध्ये 26 हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा कठोर लॉकडाऊन होणार?

निर्बंध का होऊ शकतात कठोर?

1. महाराष्ट्रात दररोज 10 हजारांच्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहे.

2. देशात 40 डेल्ट प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 21 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत.

3. या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोक्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. तसंच महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि केरळला यासाठी सावधानतेचा इशारा दिला आहे.

4. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घट होताना दिसत नाही

5. निर्बंध शिथिल केल्यानंतर बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी, दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे.

याशिवाय काल (23 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती.

Lockdown चा फटका, मुंबईतलं 5 Star ‘हयात रिजन्सी’ हॉटेल बंद

काय होऊ शकतं?

– सध्याचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय बदलला जाऊ शकतो.

– निर्बंध अधिक कठोर करण्यावर भर दिला जाईल

– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळा कमी करण्यात येतील.

येत्या काही दिवसांत याबद्दलचे नियम जाहीर करण्यात येतील.

    follow whatsapp