महाराष्ट्रात येऊ घातलेले प्रकल्प अर्थात वेदांता फऑक्सकॉन असेल किंवा नुकताच गुजरातला गेलेला टाटा एअऱबसचा प्रकल्प असेल यावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे या प्रकल्पांच्या मुद्द्यावरून सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर टीका करताना दिसत आहेत. अशात प्रकल्प गुजराला गेले ते महाविकास आघाडीमुळेच असा प्रत्यारोपही सत्ताधारी करत आहेत. आता आदित्य ठाकरेंनी ट्विटर या संबंधी एक पोलच तयार केला आहे. ज्यामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याला १६ हजार पेक्षा जास्त लोकांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे आदित्य ठाकरे यांचा प्रश्न?
घटनाबाह्य मुख्यमंत्री वेदांता फॉक्सकॉन आणि इतर उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याबद्दल माझ्याशी समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान स्वीकारतील का? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी पोलच्या माध्यमातून ट्विटरवर विचारला आहे. या प्रश्नाला १६ हजार पेक्षा जास्त लोकांनी उत्तर दिलं आहे. उत्तर देणाऱ्यापैकी ७६ टक्के लोकांनी मुख्यमंत्री तुमच्याशी चर्चा करणार नाहीत असं उत्तर दिलं आहे. तर २४ टक्के लोकांनी होय चर्चा करतील असं उत्तर दिलं आहे.
टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पत्रकार परिषद आणि टोलेबाजी
टाटा एअरबस किंवा फॉक्सकॉनबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. ते एका अर्थाने बरंच झालं. त्यामुळे त्यांना कुणाच्या हातून माईक खेचण्याची किंवा कुणाला चिठ्ठी द्यायची वेळ आली नाही. एवढंच नाही तर आज मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतल्याने राज्यात वजन कुणाचं जास्त आहे हे दिसून आलं असं म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. मात्र जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
२१ जून २०२२ ला शिवसेनेत राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतले ४० आमदार बंड करून शिंदेंसोबत गेले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि गटाला गद्दार म्हटलं जातं आहे तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आदित्य ठाकरे घटनाबाह्य मुख्यमंत्री असाच करतात. हाच उल्लेख करत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला १६ हजाराहून अधिक लोकांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT