मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर तूर्तास राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन नसल्याचं स्पष्ट झालंय. मात्र सोमवारपासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. दरम्यान सरकारकडून लावण्यात आलेल्या या कडक नियमांचा फिल्म इंडस्ट्रीला फटका बसण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
लागू केलेल्या या कडक नियमांमध्ये मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत शूटींग सुरु ठेवावी असं म्हटलंय. त्याचप्रमाणे थिएटर्स आणि नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी 50 टक्के क्षमतेवर नाट्यगृह तसंच थिएटर्स सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आजच्या निर्णयानंतर राज्यात थिएटर्स आणि नाट्यगृहांचं शटर पुन्हा एकदा डाऊन होणार असून आणि सरकारच्या याच निर्णयाचा मोठा फटका बॉलिवूड तसंच मराठी सिनेइंड्स्ट्रीला बसणार आहे.
प्रशांत दामलेंनी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांना नाटक पाहता यावं, म्हणून घेतला हा निर्णय
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नाट्गृह बंद करू नका अशी विनंती रंगकर्मींनी राज्य सरकारला केली होती. त्यावेळी नाट्यगृह बंद झाल्यास आम्ही मोडून पडू अशी भिती देखील त्यांच्याकडून व्यक्त कऱण्यात आली होती. शिवाय यासंदर्भात ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, भरत जाधव, प्रतीक्षा लोणकर या कलाकारांनी एक व्हिडीयो तयार करून ‘कठोरतेने अंमलबजावणी करा परंतु नाट्यगृह बंद करू नका असं’ आवाहन केलं होतं.
याशिवाय अनेक मराठी तसंच हिंदी सिनेमे एप्रिल महिन्यात रिलीज करण्यात येणार होते. मराठी सिनेमांमध्ये 16 एप्रिल रोजी स्वप्नील जोशीचा बळी सिनेमा, 23 एप्रिल रोजी झिम्मा तर झोंबिवली हा सिनेमा 30 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र आता थिएटर्स बंद असल्यामुळे आता या सिनेमांची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलावी लागणार आहे. बॉलिवूडमधील कंगनाचा थलायवी तर अक्षय कुमारचा सूर्यवंशी हे दोन महत्त्वाचे सिनेमे रिलीज होऊ शकणार नाही. तर या सिनेमांसंदर्भात निर्माते आणि दिग्दर्शक रिलीजसंदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT