नांदेडमधल्या हदगावात बेकायदा खोदकाम सुरू असताना सापडला महिलेचा मृतदेह

मुंबई तक

• 03:21 AM • 18 Jan 2022

नांदेडमधल्या हदगाव या ठिकाणी एका शेतात संध्याकाळच्या सुमारास अवैध उत्खनन सुरू असताना एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचं वय अंदाजे 30 ते 35 वर्षे आहे. हदगावाच्या श्री दत्त कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मागे शेत सर्व्हे क्रमांक 226 या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध खोदकाम सुरू आहे […]

Mumbaitak
follow google news

नांदेडमधल्या हदगाव या ठिकाणी एका शेतात संध्याकाळच्या सुमारास अवैध उत्खनन सुरू असताना एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचं वय अंदाजे 30 ते 35 वर्षे आहे. हदगावाच्या श्री दत्त कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मागे शेत सर्व्हे क्रमांक 226 या ठिकाणी खोदकाम सुरू आहे. तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध खोदकाम सुरू आहे त्याचवेळी हा मृतदेह आढळून आला आहे.

हे वाचलं का?

जेसीबीचा फावडा लागल्यानंतर जमिनीतून महिलेच्या प्रेताचे पाय समोर आले. हे पाहतातच जेसीबी मशीनचा कर्मचारी आणि ऑपरेटर या दोघांनी तिथून पळ काढला. ही घटना पोलिसांना कळवण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दीपक फलाने, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, बीट जमादार विश्वानथ हंबर्डे, होमगार्ड गणेश गिरबिडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले. या प्रकरणी आता पुढील तपास पोलीस करत आहेत.

    follow whatsapp