ठाणे : २७ वर्षीय तरुणीचा रिक्षातून पडून मृत्यू, मोबाईल चोरांपासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

मुंबई तक

• 02:03 AM • 11 Jun 2021

बाईकवरुन आलेल्या दोन मोबाईल चोरांपासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात २७ वर्षीय तरुणीने आपला जीव गमावला आहे. ठाण्याच्या तीन हात नाका परिसरात ही गंभीर घटना घडली असून यात कानमिला रायसिंग (वय २७) या तरुणीचा रिक्षातून पडून मृत्यू झाला आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात अल्केश अन्सारी आणि सोहेल अन्सारी या दोन तरुणांना भिवंडी येथून अटक केली आहे. कानमिला […]

Mumbaitak
follow google news

बाईकवरुन आलेल्या दोन मोबाईल चोरांपासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात २७ वर्षीय तरुणीने आपला जीव गमावला आहे. ठाण्याच्या तीन हात नाका परिसरात ही गंभीर घटना घडली असून यात कानमिला रायसिंग (वय २७) या तरुणीचा रिक्षातून पडून मृत्यू झाला आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात अल्केश अन्सारी आणि सोहेल अन्सारी या दोन तरुणांना भिवंडी येथून अटक केली आहे.

हे वाचलं का?

कानमिला रायसिंग ही मणीपूरची रहिवासी असून ती कामानिमीत्त मुंबईत आली होती. आपल्या बहिणीसोबत ती मुंबईतल्या कलिना परिसरात रहायची तर मॉलमधील एका स्पा मध्ये ती कामाला होती. गुरुवारी रात्री आपलं काम संपल्यानंतर कानमिला Eastern Express Highway वरुन रिक्षा पकडून घरी जायला निघाली. यादरम्यान दोन्ही आरोपींनी बाईकवरुन कानमिलाच्या रिक्षाचा पाठलाग करायला सुरुवात केली.

कानमिलाची रिक्षा तीन हात नाका परिसरात आली असता एका आरोपीने तिच्या हातातला मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यावेळी सावध असलेल्या कानमिलाने याला विरोध दर्शवल मोबाईल देण्यास नकार दिला. यानंतर दुसऱ्या आरोपीने तिला खेचून बाहेर काढलं. दोन्ही आरोपींनी कानमिलाचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरुन पोबारा केला. दरम्यान या झटापटीत कानमिलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

पाठीमागून येत असलेल्या कानमिलाच्या मैत्रिणींना याची माहिती मिळताच त्यांनी तिला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. यानंतर पुढील उपचारासाठी तिला कळवा रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नौपाडा पोलीस ठाण्यात या घटनेविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याआधीही याच परिसरात अशी एक घटना घडली होती ज्यामुळे सध्या स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ४ जून रोजी एका चोराने अशाच पद्धतीने बाईकवरुन एकाचा मोबाईल चोरला. यावेळीही त्या इसमाने चोराचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतू या झटापटीत सदर इसम गंभीर जखमी झाला. राबोडी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

    follow whatsapp