टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने इंदूरमधील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटही लिहली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है, या मालिकेतून ती सर्वांपर्यंत पोहचली होती.
ADVERTISEMENT
पोलिसांना सुसाईड नोट सापडली
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर गेल्या 1 वर्षांपासून इंदूरमध्ये राहत होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला. वैशालीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजाजी नगर पोलिस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या आत्महत्येमागचे कारण पोलीस शोधत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येबाबत सुसाईड नोटमधून काय माहिती मिळते, हे लवकरच कळेल.
अभिनेत्रीच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला आहे
वैशाली ठक्करच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने आत्महत्या केल्याचे वृत्त आल्यानंतर अभिनेत्रीचे सर्व चाहते आणि मित्रमंडळींना धक्का बसला आहे. वैशाली आता आपल्यात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. वैशाली टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. वैशालीने अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे. वैशालीने 2015 मध्ये टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका ये रिश्ता क्या कहलातामधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
या मालिकेत तिने संजनाची भूमिका साकारली होती. यानंतर वैशाली ‘ये है आशिकी’ मध्येही दिसली होती.ससुराल सिमर का शो मधील अंजली भारद्वाज या पात्रासाठी वैशाली ओळखली जात होती. ससुराल सिमर का या शोमधून तिला खूप लोकप्रियता मिळाली. याशिवाय वैशालीने सुपर सिस्टर, मनमोहिनी सीझन 2 मध्येही उत्तम काम केले आहे.
ADVERTISEMENT