ADVERTISEMENT
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगप्रसिद्ध इमारत आहे. जिच्याविषयी जगभरातील प्रत्येकाला माहिती आहे.
इस्लामी वास्तूकलेतून प्रेरित असलेली ही 163 मजली इमारत 829.8 मीटर उंच आहे.
यासंबंधित अशा काही रंजक गोष्टी आहेत ज्या जाणून हैराण आपण व्हाल, चला जाणून घेऊयात त्याविषयी सविस्तर.
बुर्ज खलीफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. आयफिल टॉवरपेक्षा याची उंची तीनपट अधिक आहे.
या इमारतीत जगातील सर्वात जास्त मजले, आउटडोअर ऑब्जर्वेशन डेक आणि सर्व्हिस लिफ्ट आहेत.
याच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेलं कॉन्क्रीटचं वजन 1 लाख हत्तींच्या बरोबरीचं आहे. तसंच, अॅल्यूमिनियमचं वजन पाच A380 विमानांच्या वजनाबरोबर आहे.
यामध्ये जगातील सर्वात वेगवान लिफ्ट आहे. या लिफ्टला 124 व्या माळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 1 मिनिट लागतो.
बुर्ज खलिफाच्या सर्वात वरच्या टोकाला 95 किलोमीटर दूर अंतरावरून पाहता येतं.
बुर्ज खलिफाच्या निर्मितीसाठी जवळजवळ 1 लाख 10 हजार टन कॉन्क्रीट, 55 हजार टन स्टील रिबार वापरण्यात आले आहे.
बुर्ज खलिफाची रचना एखाद्या फुलासारखी करण्यात आली आहे. जी ड्रोनने टिपण्यात आली आहे.
ADVERTISEMENT