सुप्रसिद्ध Youtuber भुवन बाम (Bhuvan Bam) याच्या आई वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयंकर म्हणावी अशीच ठरली आहे. याच जीवघेण्या लाटेने भुवन बामच्या आई-वडिलांना त्याच्यापासून हिरावलं आहे. याबाबत त्याने लिहिलेली पोस्ट वाचून आपल्याही डोळ्यात पाणी येईल.
ADVERTISEMENT
भुवन बामने त्याच्या Instagram अकाऊंटवरून आपल्या आई-वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आज मी माझं सर्वस्व गमावलं असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हटलं आहे आहे भुवन बामने?
Covid मुळे मी माझ्या दोन्ही लाईफलाईन हरवून बसलो आहे. आई बाबांशिवाय माझं जग पहिल्यासारखं नसणार. एक महिन्यात सगळं काही विस्कटून गेलं आहे. माझं घर, माझी स्वप्नं, सगळं काही हरवून गेलं आहे. माझ्याजवळ माझी आई नाही, माझे बाबा नाहीत.. आता सगळं आयुष्य पहिल्यापासून सुरू करावं लागणार आहे. माझं मन कशातच लागत नाही. मी एक चांगला मुलगा होतो का? मी माझ्या आई वडिलांना वाचवण्यासाठी सगळं काही केलं का? हे प्रश्न आता आयुष्यभर माझी पाठ सोडणार नाहीत. मी त्यांना पाहण्यासाठी आता थांबू शकत नाही.. तो दिवस आता माझ्या आयुष्यात कधी येईल? अशी पोस्ट लिहून भुवनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भुवनने ही पोस्ट केल्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि युजर्स हे भुवनचं सांत्वन करत आहेत. राजकुमार रावा, ताहिरा कश्यप, आशिष चंचलावी, कैरी मिनाटी, मुकेश छाबडा यांनी कमेंट करून दुःख व्यक्त केलं आहे. भुवनने आता धीर सोडू नये अशीही अपेक्षा सगळेजण करत आहेत.
कोण आहे भुवन बाम?
भुवन बाम हा प्रसिद्ध युट्युबर आहे आणि हास्य कलाकार आहे. तसंच तो गायक आणि गीतकारही आहे. BB की वाइन्स या नावाने त्याचं यूट्यूब चॅनलही आहे. 2018 मध्ये 10 मिलियन सबस्क्राईबर्सचा टप्पा त्याने पार केला होता. भुवन मूळचा दिल्लीचा आहे. त्याचं शिक्षण ग्रीन फिल्ड्स स्कूल दिल्ली आणि महाविद्यालयीन शिक्षम शहीद भगत सिंह महाविद्यालयातून झालं आहे. भुवन बामने त्याच्या इंटरनेट करिअरची सुरूवात एका न्यूज रिपोर्टच्या व्यंगात्मक व्हीडिओद्वारे केली होती. त्याचा पहिला व्हीडिओ पाकिस्तानात व्हायरल झाला होता. त्यामुळे आपलं स्वतःचं यू ट्युब चॅनल काढावं ही कल्पना त्याला सुचली जी त्याने प्रत्यक्षात आणली आणि तो प्रसिद्ध यूट्युबर झाला.
ADVERTISEMENT