पुण्यात १९ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या झोमॅटो बॉयला अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या कोंढवा भागात ही घटना घडली. त्यानंतर झोमॅटो बॉयला अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या App मध्ये झोमॅटो आणि स्विगी हे सुप्रसिद्ध App आहेत. अनेकजण ऑनलाईन जेवण किंवा खाद्यपदार्थ मागवण्याचा पर्याय निवडतात. अशात पुण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
पुण्यात नेमकी काय घडली घटना?
जेवणाची डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या झोमॅटो कंपनीच्या (Zomato) डिलिव्हरी बॉयने तरूणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही तरूणी घरात एकटीच असल्याचं हेरून हा तरूण घरात शिरला आणि त्याने तिचा विनयभंग केला. घडलेल्या या प्रकारानंतर तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत कारवाई केली.
पोलिसांकडून झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक
पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत या डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. ज्या तरूणीचा विनयभंग झाला ती एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला आहे. कामावरून घरी परतल्यानंतर तिने झोमॅटोवरून जेवण मागावलं होतं. जेवणाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या बॉयने ही तरूणी एकटी असल्याचं पाहून तिचा विनयभंग केला.
झोमॅटो अॅपवरून मागवलेलं जेवणाचं पार्सल हा डिलिव्हरी बॉय घेऊन आला होता. त्याने १९ वर्षांच्या या तरूणीचा विनयभंग केला. येवलेवाडी भागात असलेल्या एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी या डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. रईस शेख असं या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.
नेमका काय घडला प्रकार?
फिर्यादी तरूणी येवलेवाडी भागातल्या एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने झोमॅटोवरून जेवण मागवलं. रात्री साधारण ९, ९.३० च्या सुमारास रईस शेख हा झोमॅटोची जेवणाची डिलिव्हरी घेऊन आला. जेवणाचं पार्सल त्याने या तरूणीला दिल्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर रईस शेखने या तरूणीचा विनयभंग केला. या सगळ्या प्रकारानंतर तरूणीने पोलीस ठाणे गाठलं. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रईस शेखला अटक केली.
ADVERTISEMENT