पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. पवनेच्या पुराचं पाणी रस्त्यावर आलंय. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. रस्त्यावरुनही नदीसारखं पाणी वाहतंय.
ADVERTISEMENT
या पावसामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून काही भागात पाणी घरात शिरल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने सजगतेचा इशारा दिला आहे आणि नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. पावसाची तीव्रता कमी होण्यासाठी आणखी काही काळ लागणार असल्याचं अनुमान वर्तविण्यात येत आहे.
ADVERTISEMENT