Political News Headlines Today: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर आज (5 जुलै) मुंबईतील वांद्रेमध्ये अजित पवार गटाची (Ajit Pawar Faction) जाहीर बैठक पार पडली. ज्यामध्ये अजित पवारांसह (Ajit Pawar) नुकतेच शपथ घेतलेले मंत्री आणि अनेक आमदार हजर होते. याच बैठकीच्या सुरुवातीला बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अतिशय तडाखेबंद अशा भाषणाने शरद पवारांवर एक प्रकारे निशाणा साधला. याच आपल्या भाषणात छगन भुजबळांनी पहाटेच्या शपथविधीवरुन गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांच्या गुगलीमुळे आपल्याच नेत्याची विकेट गेल्याचं विधान छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात केलं आहे. (2019 devendra fadnavis and ajit pawar swearing-in sharad pawar chhagan bhujbal big statement ncp wicket googly news on maharashtra politics)
ADVERTISEMENT
‘2019 ला दादा म्हणतात.. पहाटे नाही.. सकाळी सकाळी अरे पण तो शपथविधी का झाला? त्याच्यापाठी कोण होतं? ते फडणवीस सांगतात असं असं झालं.. साहेब म्हणतात मी गुगली टाकली.. अरे पण गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? त्या गुगलीमध्ये आपलाच गडी आऊट झाला ना भाऊ. आम्हालाही हे माहिती नाही.’, असं खळबळजनक विधान छगन भुजबळ यांनी यावेळी केली आहे.
छगन भुजबळांचा थेट शरद पवारांवर निशाणा?
‘एक तर आम्ही 1999 साली आम्ही काँग्रेस सोडली.. आम्ही काँग्रेस सोडली म्हणण्यापेक्षा दूर झालो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली निवडणूक झाली.. परत आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. पवार साहेब परत काँग्रेसच्या मंत्रिमंडळात सामील झाले. आपण कामाला लागलो. देशाच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या वेळेला आपण निर्णय घेतले आणि आम्ही तेव्हा सर्व त्यांच्यासोबत होतो.’
‘त्यावेळी असं काय झालं.. त्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवत होतो. पण मग असं काय झालं की, 2014 साली काँग्रेसशी युती तोडली? वेगळं लढायचं कारण काय? तर भाजपने शिवसेनेला सोडलं आणि इकडे राष्ट्रवादीने काँग्रेस सोडली. का? अजूनही कळत नाहीए लोकांना.. एकत्र तर लढत होतो.. त्यांनी सोडली तर सोडली.. आपण काँग्रेससोबत राहिलो असतो. आपलं बहुमत आलं असतं. का सोडली.. काय चर्चा झाली? माहीत नाही.’
हे ही वाचा>> Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवारांचं मोठं पाऊल, सुरू केली तयारी
‘अचानक हे निर्णय कसे काय होतात? 2019 ला दादा म्हणतात.. पहाटे नाही.. सकाळी सकाळी अरे पण तो शपथविधी का झाला? त्याच्यापाठी कोण होतं? ते फडणवीस सांगतात असं असं झालं.. साहेब म्हणतात मी गुगली टाकली.. अरे पण गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? त्या गुगलीमध्ये आपलाच गडी आऊट झाला ना भाऊ. आम्हालाही हे माहिती नाही. आता ते दादा सांगतील. त्यांची इच्छा असेल तर.. कारण हा प्रश्न अख्ख्या हिंदुस्थानला पडला आहे. त्यांनंतर अनेक वेळा झालं.’
‘2019 निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर सुद्धा काय बोलणी झाली? का अजितदादा सकाळीच उठले आणि गेले तिकडे? काय असंच? काय कारण होतं? सांगितलं गेले पाहिजे जनतेला.. माहीत पडेल. काय झालं, कोणाशी चर्चा झाली.. कशामुळे हा निर्णय झाला..’
हे ही वाचा>> NCP: खरी राष्ट्रवादी कोणाची… दोन्ही पवारांसाठी आमदार किती महत्त्वाचे?
‘मला एक कळत नाही की, वारंवार आपण दिल्लीत चर्चा करायची. काही दिवस झाले की ताबडतोब जे आहे त्यातून माघार घ्यायची अनेक नेत्यांना तोंडघशी आपण टाकतो आहोत पाडतो आहोत हे सुद्धा आपल्याला कसं लक्षात येत नाही?’
‘साहेबांनी राजीनामा दिला आम्हाला माहितीच नाही.. हे अजितदादा ते म्हणाले मला प्रांताध्यक्ष व्हायचं आहे. आमच्या सुप्रिया ताई म्हणतात.. ओ तुम्हाला सांगितलं होतं का? म्हटलं आम्हाला कोण सांगतंय.. ना काका सांगत ना पुतण्या सांगत. अगोदर जाहीर करतात मग सांगतात.’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT