Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

18 Nov 2023 (अपडेटेड: 18 Nov 2023, 03:28 AM)

मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून दोन अधिकारी शुक्रवारी मध्यरात्री 10 च्या सुमारास एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कलम 447 आणि कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

aditya thackeray case has been register lower parle flyover delie road inaugration case

aditya thackeray case has been register lower parle flyover delie road inaugration case

follow google news

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरेंसह शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे. आता नेमक्या कोणत्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे? आणि हे नेमके संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.(aditya thackeray case has been register lower parle flyover delie road inaugration case)

हे वाचलं का?

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिलाई रोड (Delai Road Flyover case) ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून दोन अधिकारी शुक्रवारी मध्यरात्री 10 च्या सुमारास एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कलम 447 आणि कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange : ‘त्यांना आवरा, नसता…’, जरांगेंनी भुजबळांविरुद्ध थोपटले दंड; शिंदे, फडणवीस, पवारांना काय दिला इशारा?

गुरूवारी 16 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डिलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली असून त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यातल आली होती. या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : “एक मंत्री उघडपणे…”, संभाजीराजे शिंदे सरकारवर भडकले, भुजबळांचा राजीनामाच मागितला

FIR मध्ये काय?

दिनांक 16/11 /2023 रोजी रात्री 9.30 वाजता वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई यांचे पूर्वपरवानगी शिवाय काम अपूर्ण असलेल्या लोअर परेल ब्रिजच्या सुरुवातीला एसीक भवन समोर लावलेले बॅरिगेट काढून ब्रिजवर अतिक्रमण करून ते त्यांचे सहकारी व कार्यकर्ते समवेत ब्रिजचे मध्यापर्यंत पायी चालत जाऊन त्यांनी वाहतुकीस तयार नसलेला दक्षिण वाहिनी पूल हा वाहतुकीस अनधिकृतरीत्या खुला केल्याने ब्रिजवरून वाहतूक सुरू झाली. त्यावरून काही वाहन जाऊन वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.

दरम्यान महापालिकेच्या या तक्रारीवरून आता आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.

    follow whatsapp