Ajit Pawar : “सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारमधून बाहेर पडा”, घोषणांनी बारामती दणणाली

रोहित गोळे

04 Sep 2023 (अपडेटेड: 04 Sep 2023, 03:16 PM)

Ajit Pawar : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर आता वातावरण तापले आहे.

agitation baramati for deputy chief minister ajit pawar to quit government devendra fadnavis criticize

agitation baramati for deputy chief minister ajit pawar to quit government devendra fadnavis criticize

follow google news

Ajit Pawar : जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी जरांगे-पाटील यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनात सरभागी झालेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला. या लाठीहल्ल्यात (Lathi charge) अनेक महिला आणि पुरुष गंभीर जखमी झाले. त्यानंतर हे आंदोलन चिघळल्याने राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी अंतरवाली सराटीकडे धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

हे वाचलं का?

तो आदेश कोणाचा…

विरोधकांनी अंतरवाली सराटीला भेट देऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा नेमका आदेश दिला कोणी असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला. मराठा आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले, आणि त्यामुळे आता बारामतीमधून अजित पवार यांच्याबद्दल जोरदार घोषणाबाजी करुन त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे अशी मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Raj Thackeray Maratha Morcha : ‘अरे व्वा! तुम्ही काय केलं असतं?’, राज ठाकरे फडणवीसांवर भडकले

बाहेर पडा बाहेर पडा…

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या विरोधात बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मराठा समाजातील आंदोलकांनी “सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारमधून बाहेर पडा” अशा घोषणा देत अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभर ठीक ठिकाणी बंद

मराठा आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा मराठा समाज मोठ्या संख्येने एकवटला असून राज्यभर ठीक ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. बारामतीत देखील बंदला व्यापाऱ्यांनी 100 टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चेकरी बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून भिगवन चौकात पोहोचले.

हे ही वाचा >> Pankaja Munde : शिवशक्ती परिक्रमा यात्रा काय? पंकजा मुंडे कोणत्या जिल्ह्यात फिरणार?

सरकार विरोधात घोषणा

या ठिकाणी हुतात्मा स्तंभाजवळ मोर्चेकरांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामतीतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्याबरोबरच अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडा असे आवाहनदेखील करण्यात आल्याने राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.

    follow whatsapp