Ajit Pawar Criticize Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. यानंतर अजित पवारांनी अनेकदा शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना डिवचलं होतं.आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. वय झाल्यानंतर थांबायचा असतं, पण काही काही जण ऐकायला तयार नाहीत हट्टीपणा करतात, असा हल्ला अजित पवारांनी शरद पवारांवर चढवला आहे. तसेच आम्ही कुठे चुकलो तर सांगाना आम्हाला, आम्ही आहोत ना करायला, असे देखील अजित पवार (Ajit pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) उद्देशून म्हणाले आहेत. (ajit pawar criticize sharad pawar age kalyan karykarta melava ncp politics maharashtra politics)
ADVERTISEMENT
कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला होता. ‘वय झाल्यानंतर थांबायचा असतं, पण काही काही जण ऐकायलाच तयार नाही, हट्टीपणा करतात, असा हल्ला अजितदादांनी शरद पवारांवर चढवला. राज्य सरकारमध्ये 58 व्या वयात अनेकजण रिटायरमेंट घेतात. काही जण 65 ला, वयाच्या सत्तरीला किंवा 75 तरीला रिटायर होतात. पण इकडे वय 80- 84 झालं तरी माणूस रिटायर होईना.अरे काय चाललंय काय, असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच आम्ही आहोत ना करायला, आम्ही कुठे चुकलो तर सांगाना. आमच्यात तशी धमक आणि ताकद आहे. पाच पाच सहा सहा वेळा आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री पद सांभाळलं आहे, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Sharad Mohol : चार महिन्यापूर्वी पिस्तूल खरेदी अन् 25 दिवसांत मोहोळचा गेम, Inside Story
ठाणे जिल्ह्यात कोण दादागिरी करतो. कोण दहशत निर्माण करतो. त्यांच्यावर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे, असे विधान करून अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं होतं. वेडेवाकडे धंदे, व्यवसाय अजिबात चालणार नाही. नवीन येणाऱ्यांचे पक्षात स्वागतच. पण त्यांच्या आमच्या भूमिकेमुळे पक्षाला कमी पणा येईल असे कुठलंही कृत्य करू नका. तसेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार करा, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
हे ही वाचा : Naresh Goyal : “मला तुरुंगातच मरु द्या”, जेट एअरवेजच्या संस्थापकांना न्यायालयात अश्रू अनावर
ADVERTISEMENT