Samit Kadam on Anil Deshmukh, Devendra Fadnavis : स्वाती चिखलीकर, सांगली : ''उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करा, मग आम्ही तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून मुक्त करू असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव आणला होता असा आरोप तत्कालीन गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी यासाठी समित कदम यांना पाठवल्याचे देखील देशमुखांनी सांगितले होते. या सर्व प्रकरणात आता समित कदम यांनी समोर येऊन मोठा खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
समित कदम हे मिरजेतील जनसुराज्य शक्ती युवा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना समित कदम यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे या प्रकरणात आता समित कदम यांनी आपली बाजू मांडली आहे.''मी स्वत:हून अनिल देशमुख यांना भेटायला गेलो नव्हतो, तर देशमुखांनीच मला भेटायला बोलावलं होतं, त्यामध्ये फडणवीसांचा संबंध नाही'',असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : Ajit Pawar : ''अजित दादांसारख्या व्यक्तीमत्वाला तोंड लपवून...'', ठाकरेंच्या नेत्याची बोचरी टीका
अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपावर बोलताना समित कदम म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्या अडचणी कमी करता येतात का पाहा अशी विनंती अनिल देशमुखांना केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आपण देशमुखांची भेट घेतली नव्हती. उलट देशमुखांनी बोलावल्यावर आपण त्यांची भेट घेतली होती.
समित कदम पुढे म्हणाले, त्यावेळी अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्यांना झेड प्लस सिक्युरिटी होती त्यांनी बोलवल्या शिवाय त्यांना भेटूच शकत नाही. तीन वर्षापूर्वीची भेटीबाबत बोलून त्यांना काय नरेटीव्ह सेट करून टार्गेट करायचं आहे. हे त्यांनाच माहिती त्याच्या घरी भेट झाली यात देवेंद्र फडवणीस यांचा काहीही संबंध नाही असे सडेतोड उत्तर कदम यांनी दिले आहे.
देशमुखांचा आरोप काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेल्या निरोप्याचे नाव समित कदम असल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली होती. उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याविरोधात आरोप करणारे अॅफिडेव्हिट द्यावे असा निरोप फडणवीसांनी दिला होता असं देशमुखांनी सांगितलं.
हे ही वाचा : Video : ''भारतात पासपोर्ट, व्हिसाशिवाय घुसखोरी,'' युट्यूबरच्या 'या' व्हिडिओने खळबळ
समित कदम आपल्याकडे यासंदर्भात पाच ते सहा वेळा आला असल्याचा दावा देशमुखांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप काय करायचे त्याचा लिफाफा समितने दिल्याचं देशमुखांनी सांगितलं. समितसोबतच्या संवादाची व्हिडीओ क्लिपसुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला. पण 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपात काही तथ्य नसल्याचं आपण समित कदमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना कळवलं आणि नेत्यांविरोधात आरोप करणार नसल्याचं सांगितलं असं देशमुख म्हणाले.
ADVERTISEMENT