Uddhav Thackeray : विधानसभेआधीच महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरेंच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

मुंबई तक

01 Aug 2024 (अपडेटेड: 01 Aug 2024, 08:33 PM)

Uddhav Thackeray News : ''महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता, उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत'', असे मोठं विधान ठाकरेंच्या नेत्याने केले आहे. या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता आहे.

assemble election 2024 congress decided to fight 15 mumbai seat udhhav thackeay shiv sena ubt leader angree

उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता

point

उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत

point

ठाकरेंच्या नेत्याच्या विधानाने महायुतीत खळबळ

Maha Vikas Aghadi, Uddhav Thackeray : नितीन मोरे, शिर्डी : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे नियोजनही सूरू आहे. असे असताना आता ''महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता, उद्धव ठाकरेंमुळे  काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत'', असे मोठं विधान ठाकरेंच्या ( नेत्याने केले आहे. या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी येण्याची शक्यता आहे.  (assemble election 2024 congress decided to fight 15 mumbai seat udhhav thackeay shiv sena ubt leader angree) 

हे वाचलं का?

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब शिर्डीत  साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी काँग्रेसने महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा करणार असल्याचा प्रश्न केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी कॉग्रेसची चांगलीच कान उघडणी केली आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange : अंतरावली सराटीत मनोज जरांगे का रडले?

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. आम्ही तिघे एकत्र आलो विशेष करून उद्धव ठाकरे यांनी विशेष भूमिका बजावल्याने काँग्रेस पक्षाचे एवढे खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा आधी आपला एकही खासदार नव्हता हे आनंदाच्या भरात काँग्रेसचे नेते विसरले असतील. मात्र प्रत्यक्षात जागा वाटपाचा चर्चेला बसतील त्यावेळी याचे भान काँग्रेसला येईल असा उपरोधीत टोला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. सध्या काँग्रेसकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. मुंबईत काँग्रेसकडून मुंबईतील सर्वच 36 मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व निरीक्षक या मतदार संघाचा आढावा घेणार आहे. हे निरीक्षक कोणत्या उमेदवाराला पसंती द्यायची आहे, याचा आढावा घेणार आहेत. हा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर तो वरीष्ठांकडे सोपवला जाणार आहे.

हे ही वाचा :  Mukhyamantri Vayoshri Yojana : जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये, वाचा 'मुख्यमंत्री वयोश्री योजने'ची A टू Z माहिती

दरम्यान काँग्रेसकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल, धारावी, भायखळा, वडाळा, अणुशक्ती नगर, चांदिवली या काही मतदारसघांवर काँग्रेस दावा करणार असल्याचे बोललं जात आहे. यातील काही मतदारसंघ हे ठाकरे गटाच्या वाट्याला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही महाविकासआघाडीमध्ये जागावाटपाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    follow whatsapp