Baba Siddique : ''सलमानची हेल्प करणाऱ्याचा हिशोब...'', बिश्नाेई गँगच्या मेंबरची खळबळजनक धमकी

मुंबई तक

13 Oct 2024 (अपडेटेड: 13 Oct 2024, 03:50 PM)

Baba Siddique Murder case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या शुबू लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून एक फेसबूक पोस्ट करण्यात आली आहे. या फेसबूक पोस्टमधून बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी घेतल्याचा दावा केला जात आहे.

baba siddique murder case lawrence bishnoi gang takes responsibility  who is shubu lonkar akola gang member shocking crime story

बिश्नाई गँगच्या मेंबरची खळबळजनक धमकी

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात

point

अकोलामधील गँग मेंबरच्या पोस्टने खळबळ

point

त्या पोस्टमध्ये काय?

Baba Siddique Murder case : धनंजय साबळे, अकोला  :  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती आहे. तसेच ज्या दोन हल्लेखोरांना अटक झाली होती, ते बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचीही सुत्रांची माहिती मिळतेय. अशात या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी स्विकारणारी पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून सलमानला धमकी देण्यात आली आहे. नेमकी ही पोस्ट कोणी केली आहे? त्यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे? याचा आता पोलीस तपास करतायत.  (baba siddique murder case lawrence bishnoi gang takes responsibility  who is shubu lonkar akola gang member shocking crime story)  

हे वाचलं का?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या शुबू लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून एक फेसबूक पोस्ट करण्यात आली आहे. या फेसबूक पोस्टमधून बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी घेतल्याचा दावा केला जात आहे. यानंतर केंद्रीय यंत्रणांनी या पोस्टची चौकशी सुरू केली आहे. 

हे ही वाचा : Firing on Baba Siddique : सलमान खानचे खास असल्याची किंमत बाबा सिद्दीकींना चुकवावी लागली?

शुबू लोणकरची पोस्ट जशीच्या तशी...

 ओम जय श्री राम, जय भारत, जीवनाचे मोल समजते. शरीर आणि धनाला धूळीसमान मानतो. जे केले ते सत्कर्म होते, मैत्र धर्म पाळला. सलमान खान आम्हाला ही लढाई नको होती. पण तू आमच्या भावाला नुकसान पोहोचवले. आज ज्या बाबा सिद्दीकीचे कौतुक होत आहे, तो एकेकाळी सलमान खानसह मकोका गुन्ह्यात सहभागी होता. अनुज थापन आणि दाऊद इब्राहिमला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडल्यामुळे त्याची हत्या झाली. आमचे कुणाशीही शत्रूत्व नाही. पण जो कुणी सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल, त्याचा हिशेब केला जाईल.आमच्या कोणत्याही मित्राला जर मारले गेले तर आम्ही प्रतिक्रिया देणारच. आम्ही पहिला वार कधीच नाही केला. जय श्री राम, जय भारत, शहीदांना सलाम...

कोण आहे शुबू लोणकर? 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लोणकर हा प्रत्यक्षात शुभम रामेश्वर लोणकर असू शकतो जो अकोला पोलिसांच्या रडारवर होता. शुभम लोणकर हा अकोल्यातील अकोट येथील रहिवासी असून त्याला अकोला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी त्याला शस्त्रास्त्र तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शुभमचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले जाते.

हे ही वाचा : Who is Baba Siddique: भर रस्त्यात हत्या झालेले बाबा सिद्दीकी नेमके होते तरी कोण?, बॉलिवूडमध्येही...

बिश्नोई गँगशी कनेक्शनचे ढीगभर पूरावे 

शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील संभाषणाचे अनेक कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहेत, ज्यामुळे त्यांच्या जवळच्या संपर्काची पुष्टी झाली आहे. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहे. शुभम लोणकरवर यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे, पण शुबू लोणकर आणि शुभम लोणकर हे दोघे एकच आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी सांगितले आहे. आता फेसबुक पोस्ट करणारा शुभम लोणकर हाच शुभम लोणकर आहे की आणखी कोणी? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत.

पोस्टवर पोलीस काय म्हणाले?  

या प्रकरणी अकोट विभागाचे एसीपी अमोल मित्तल यांनी आज तक फोनवर सांगितले की, त्यांची फेसबुक पोस्ट आल्यानंतर आम्ही त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या घराची झडती घेतली, परंतु त्याची फेसबुक पोस्ट आहे की नाही त्यांनी केले होते की नाही, यावर अजूनही सस्पेंस आहे, असे असतानाही आमची जबाबदारी असल्याने आम्ही या घटनेचा आणि या घटनेतील आरोपींचा तपास करत आहोत.

    follow whatsapp