Baba Siddique : गावात एकाचा काटा काढला, 18 व्या वर्षी जेल..., सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरची क्रिमिनल हिस्ट्री

मुंबई तक

13 Oct 2024 (अपडेटेड: 13 Oct 2024, 05:23 PM)

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता मुंबई क्राईम ब्रांचने दोन आरोपींना अटक केली होती. यामधला एक आरोपी धर्मराज राजेश कश्यप (19) हा युपीच्या बहराईचचा आहे. तर दुसरा आरोपी गुरमेल बलजीत सिंह (23) हा हरियाणाचा आहे. या दोन आरोपींपैकी गुरमेलीची क्रिमिनस हिस्टरी आता समोर आली आहे.

baba siddiqui murder haryana shooter gurmail kaithal criminal history family reaction lawrence bishnoi gang salman khan

सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरची क्रिमिनल हिस्टरी

follow google news

बातम्या हायलाइट

point

बर्फाच्या सूईने गावातील एकाची हत्या

point

हत्या प्रकरणात तुरूंगात होता

point

तूरूगातून जामीनावर आला होता बाहेर

Baba Siddique Murder Case : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात आता मुंबई क्राईम ब्रांचने दोन आरोपींना अटक केली होती. यामधला एक आरोपी धर्मराज राजेश कश्यप  (19) हा युपीच्या बहराईचचा आहे. तर दुसरा आरोपी गुरमेल बलजीत सिंह (23) हा हरियाणाचा आहे. गुरमेलला आता 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे.  या दोन आरोपींपैकी गुरमेलीची क्रिमिनस हिस्ट्री आता समोर आली आहे. (baba siddiqui murder haryana shooter gurmail kaithal criminal history family reaction lawrence bishnoi gang salman khan) 

हे वाचलं का?

आरोपी गुरमेलचे आई-वडील लहाणपणीच मरण पावले होते. त्यामुळे गुरमेल हा लहाणपणापासून त्यांची आजी आणि धाकट्या भावासोबत राहत होता. त्यानंतर एका हत्येचा प्रकरणात तो तुरूंगात गेला होता. तूरूंगातून परतल्यानंतर आमचा त्याच्याशी संपर्कच झाला नाही, असे गुरमेलच्या आजीने आज तकला सांगितले आहे. 

हे ही वाचा : Baba Siddique : ''सलमानची हेल्प करणाऱ्याचा हिशोब...'', बिश्नाेई गँगच्या मेंबरची खळबळजनक धमकी

गुरमेलच्या आजी पुढे सांगते की,  2019 मध्ये त्याने गावातील एका व्यक्तीची बर्फाच्या सुईने (बर्फ फोडण्याची सूई) हत्या केली होती. या हत्याप्रकणात त्याला तुरूंगवासही झाला होता. त्यानंतर तीन चार महिन्यानंतर तो जामीनावर बाहेर आला होता. मात्र त्याचा जामीन कुणी केला होता, याची आम्हाला काहीच माहिती नाही आहे, 

गुरमेल जामिनावर बाहेर आल्यावर तो घरी आला होता. आणि काही मिनिटे घरी थांबून परत निघून गेला होता. त्यावेळी मी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. आणि मला गुरमेलला पाहताच आले नव्हते. त्यानंतर जो गुरमेल जो घरातून गेला त्यानंतर आमचा त्याच्याशी संपर्कच झाला नाही. आणि तो कोणत्याही सणासुदीसाठी किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला देखील आला नाही, असे गुरमेलच्या आजीने सांगितले. तसेच सध्या ती तिच्या गावात गुरमेलचा धाकटा सावत्र भाऊ प्रिन्ससोबत राहते.

हे ही वाचा : Baba Siddique Death : अजित पवारांचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येची Inside Story

दोन आरोपी कोण आहेत? 

लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. तो यूपीच्या बहराइचचाही रहिवासी आहे. त्यांच्या गुन्हेगारी इतिहासासाठी मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता, दोन्ही आरोपींविरुद्ध जिल्ह्यात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. धर्मराज राजेश कश्यप आणि शिवकुमार गौतम उर्फशिवा बहराइच जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गंडारा शहरातील रहिवासी आहेत. मात्र, हरियाणाचा रहिवासी असलेल्या गुरमेल बलजीतवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल आहे.

    follow whatsapp