Bacchu Kadu : 'घरी बसून खा अन् घ्या 1500 रुपये', बच्चू कडूंच्या विधानाने महायुतीत नाराजी

मुंबई तक

29 Jul 2024 (अपडेटेड: 29 Jul 2024, 09:52 PM)

Ladki Bahin Yojana Scheme : बच्चू कडू आज धाराशीवच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमातून बोलताना बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेवरून रोखठोकपणे भूमिका मांडली.तसेच लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून देखील सरकारला मोठा सल्ला दिला आहे.

bacchu Kadu reaction on ladki bahin yojana and suggest to sell governor bunglow dharashiv sabha mahayuti government

लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंची टीका

follow google news

बातम्या हायलाइट

point

कष्टकऱ्यांसाठी कोणती योजना आहे का?

point

सरकारच्या योजना या काम न करणाऱ्यांसाठीच

point

लाडकी बहीण योजनेवर बच्चू कडूंची टीका

Bacchu kadu on Ladki Bahin Yojana : ''कष्टकऱ्यांसाठी कोणती योजना आहे का? घरी बसून खा अन् घ्या 1500 रुपये. आता आम्ही सांगणार लाडका भाऊ अन् लाडकी बहीण नाही. लाडका आमदार आणि लाडका मुख्यमंत्री, जो सर्वसामान्यांचा विचार करेल'', अशी जोरदार टीका बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी यावेळी केली. (bacchu kadu reaction on ladki bahin yojana and suggest to sell governor bunglow dharashiv sabha mahayuti government)  

हे वाचलं का?

बच्चू कडू आज धाराशीवच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमातून बोलताना बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेवरून रोखठोकपणे भूमिका मांडली.तसेच लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून देखील मध्यंतरी राजकारण पेटले होते. यावर बच्चू कडू यांनी सरकारला मोठा सल्ला दिला आहे. 

''आमचा महाराष्ट्राचा राज्यपाल हा 40 एकरावर राहतो,त्याचे पाय व हात किती लांब आहे हे पहावे लागेल. चार ही बाजुने समुद्र दिसतो,आम्हाला इथं चारही बाजुने पाहीलं तर मौतच दिसते, आता घ्या त्या राजपालाला पदरात घालुन, आणि लाडकी बहीण योजनेसाठी पैसै नसतील तर राज्यपालांचा बंगला विका,असा सल्ला बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.   

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana Form: लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होणार की नाही?, छाननी सुरू

सरकारच्या योजना या बऱ्यापैकी काम न करणाऱ्यांसाठीच असतात. एसटी चालक म्हणतोय आम्हाला 2000 वाढवून दिले तरी पोट भरतंय आमचं. त्याला 2 हजार वाढवून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि 1500 रूपये लाडक्या बहिणींना जाहीर करतंय.आमचं इतकचं म्हणण आहे, दुधाला भाव द्या,शेतीला भाव द्या, कामगाराला मजूरू द्या, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. 

कष्टकऱ्यांसाठी एखादी योजना असली पाहिजे ना. तुम्ही आठ दिवस काम केल कोणती योजना आहे. घरी बसुन खा.... घ्या हे 1500 रुपये, लाडकी बहीण लाडका भाऊ आणली पण आता लाडका भाऊ आणि बहीण ही नको आम्हाला आता लाडका आमदार व लाडका मुख्यमंत्री पाहीजे, आम्हाला - जो सामान्य माणसाचा विचार करेल व ते गरजेचे आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.

हे ही वाचा : Vishal Patil : विशाल पाटलांचं लोकसभेत घणाघाती भाषण; म्हणाले,''17 खासदारांना तरी...''

आमचे 25 बी आमदार  निवडून आले तर आम्ही प्राध्यापक आणि आमदाराच्या पगारी कमी करण्याचं पहिलं काम करू. भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर त्यांनी दाखवावी प्राध्यापकाला अडीच लाख आमदारांना तीन लाख एवढा पगार कशासाठी एका पंक्तीमध्ये काहीच नाही तर दुसऱ्या पंक्तीमध्ये बळच टाकताय.  कुणाच्या बापाचं राज्य आहे का? आम्ही मतं देतोय त्यामुळे ही गुंडागर्दी चालणार नाही, असे देखील बच्चू कडू म्हणाले आहेत. 

    follow whatsapp