Karuna Sharma : करूणा शर्मा यांनी आज पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोघांमधील वादाचं प्रकरण सध्या कोर्टात आहे, तर दुसरीकडे करूणा शर्मा या माध्यमांसमोर आरोपांची राळ उठवत आहेत. धनंजय मुंडे आणि मी 27 वर्ष सोबत होते, त्यामुळे मीच त्यांची पहिली बायको आहे असं करूणा शर्मा म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Viral News : बायकोचं अफेयर समजताच नवऱ्याची सटकली! प्रियकरावर फायरिंग केली अन् घडलं...
करूणा शर्मा यांनी कुणाची नावं घेतली?
करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना राज घटनवट, पुरूषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर आणि वाल्मिक कराड यांचीही नावं घेतली आहेत. त्यांच्यामुळेच मी रस्त्यावर आले आणि धनंजय मुंडे घरी बसले आहेत असं म्हणाल्या. मी घेतलेल्या कर्जासाठी पती धनंजय मुंडे म्हणून गॅरेंटर आहेत. अनेक कागदपत्रांवर असलेल्या सह्या सुद्धा त्यांनी दाखवल्या. माझ्याकडे पुरावे नसते, तर मी कोर्टात गेले नसते. धनंजय मुंडे यांना हा मुद्दा दाबायचा होता. माझ्यासोबत जो प्रेमप्रकरण करुन लग्न करेल, त्याला 20 कोटी रुपयांची ऑफर होती असंही करूणा शर्मा म्हणाल्या आहेत.
मी चटणी भाकरी खाऊन जगू शकते, माझा लढा पैशासाठी नाही. पण मीच धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे. मी आणि धनंजय मुंडे सगळं विश्व फिरलोय. आमचे व्हिजा सुद्धा माझ्याकडे आहेत. तर राजश्रीला कुठेच त्यांनी नेलेलं नाही असंही करूणा शर्मा म्हणाल्या.
हे ही वाचा >> Thane : "दोन वेळा मुलीच झाल्या, मुलगा का होत नाही", पती सतत त्रास द्यायचा, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
मला कोट्यवधी रुपयांची लाच देऊन, दुबईमध्ये पाठवण्याचा प्लॅन होता. त्यांनी मला दिलेली ऑफर मी फेटाळली. माझ्याकडे पुरावे नसते तर मी पळून गेले असते. हा व्यक्ती आज मंत्री आहे, महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं पाहिजे, की 27 वर्ष सोबत राहणाऱ्या पत्नीला असं रस्त्यावर आणलं आहे.
1996 मध्ये मला हिरोईन होण्याची ऑफर होती, पण मी पतीसोबत राहायचं ठरवलं. माझ्या घरी गुंड पाठवायचे, माझ्यामागे माणसं पाठवायचे असे षड्यंत्र रचले आहेत असं
ADVERTISEMENT
