मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन अजित पवार हे भाजपच्या सोबत गेल्यानंतर त्यांना नेमकं काय-काय मिळणार अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर 12 दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या एंट्रीने कोणाला काय खाती द्यायची यावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये बराच वाद होता. अखेर दोन दिवसांपूर्वी तीनही नेत्यांची जी दिल्ली वारी झाली त्यानंतर नेमका तोडगा निघाला आणि आज (14 जुलै) अखेर खाते वाटप जाहीर झालं. (big upheaval in maharashtra cabinet Portfolio allocation announced complete list in one click ajit pawar fm ministry shiv sena ncp bjp devendra fadnavis eknath shinde maharashtra politics news today)
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ..
खातेवाटप जाहीर होताच राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जी महत्त्वाची खाती शिंदेंच्या मंत्र्यांकडे होती ती काढून आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. जे शिवसेना मंत्र्यांच्या जिव्हारी लागलं आहे. खातेवाटपानंतर सर्वात जास्त फटका हा शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांना बसला आहे. कारण त्यांच्या असणारं अत्यंत महत्त्वाचं कृषी खातं काढून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांना दिलं आहे.
मात्र, यापेक्षा सर्वात जास्त धक्का हा शिवसेनेच्या आमदारांना बसलाय तो अजित पवार यांच्याकडे गेलेल्या अर्थ खात्याच्या रुपाने. कारण साधारण वर्षभरापूर्वी शिवसेनेत बंड केलेल्या मंत्री आणि आमदारांनी अशी ओरड केलेली होती की, तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना निधी देत नाही. असं असताना आता पुन्हा एकदा त्याच अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे. अशावेळी आता सत्तेत असणारे शिवसेनेचे आमदार किंवा मंत्री आता याविषयी काय बोलणार? असा सवाल सध्या विचारला जात आहे.
पाहा कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली?
- श्री. एकनाथ संभाजी शिंदे, मुख्यमंत्री- सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.
- श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, उप मुख्यमंत्री – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार
- श्री. अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री – वित्त व नियोजन
- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- श्री. दिलीपराव दत्तात्राय वळसे-पाटील – सहकार
- श्री. राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास
- श्री. सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय
- श्री. हसन मिय्यालाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य
- श्री. चंद्रकांत (दादा) बच्चु पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्राद्योग, संसदीय कार्ये
- श्री. विजयकुमार कृष्णराव गावित – आदिवासी विकास
- श्री. गिरीश दत्तात्रय महाजन – ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन
- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील – पाणी पुरवठा व स्वच्छता
- श्री. दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
- श्री. संजय दुलीचंद राठोड – मृद व जलसंधारण
- श्री. धनंजय पंडीतराव मुंडे – कृषी
- श्री. सुरेश (भाऊ) दगडू खाडे – कामगार
- श्री. संदीपानराव आसाराम भुमरे – रोजगार हमी योजना, फलोत्पादन
- श्री. उदय रविंद्र सामंत – उद्योग
- श्री. तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- श्री. रविंद्र दत्तात्राय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
- श्री. अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
- श्री. दिपक वसंतराव केसरकर – शालेय शिक्षण, मराठी भाषा
- श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
- श्री. अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण
- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क
- कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
- श्री. संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
- श्री. मंगलप्रभात लोढा – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
- श्री. अनिल भाईदास पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
ADVERTISEMENT