Mahavikas Aaghadi :
ADVERTISEMENT
नागपूर : आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीतील मजबूत करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाविकास आघाडीने राज्यात विभागनिहाय ‘वज्रमूठ’ सभेचे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली सभा पार पडल्यानंतर नागपूरमध्ये येत्या १६ एप्रिलला दुसरी वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ही सभा अडचणीत आली आहे. (BJP leader’s strong opposition to Mahavikas Aghadi’s public meeting in Nagpur)
या नागपूरमधील नियोजित “वज्रमूठ’ सभेवरून भाजप-काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. क्रीडा मैदानात ही सभा होऊ नये म्हणून भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या ‘दर्शन कॉलनी सद्भावना नगर क्रीडा मैदान बचाव समिती’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. समितीचे कार्यकर्ते धीरज शर्मा यांच्यासह इतर तीन जणांनी याचिका दाखल केली असून अॅड. रजत माहेश्वरी व अॅड. पलाश चकोले हे वकील आहेत. गुरूवार (१३ एप्रिल) न्या. अतुल चांदुरकर व न्या. महेंद्र चांदवानी यांच्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar : ईडी क्लिनचीट, अंजली दमानियाचं ट्विट; पवारांनी संपवला सस्पेन्स
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा सभेला विरोध कायम आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांना पुढे करुन आंदोलन सुरू केले आहे. मात्र या विरोधाकडे लक्ष न देता सभेचे मुख्य संयोजक सुनील केदार तसेच शिवसेना (UBT) खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी मैदानाची पाहणी करीत सभा होणारच हे स्पष्ट केले. काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी गरज भासल्यास आमदार निधीतून मैदान चांगले करून देऊ अशी ग्वाही दिली आहे. पण या भागात सभेला कोणाचाही विरोध नाही, उलट उद्धव ठाकरे, अजित पवार आदींना ऐकण्यास लोक उत्सुक असल्याने सभा होईल असे ठणकावून सांगितले. दुसऱ्या बाजूला खोपडे यांचा विरोध म्हणजे भाजपचा नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
मुंडे भावा-बहिणीच्या संघर्षाला पूर्णविराम? राजकारणात मोठी घडामोड
विनायक राऊत काय म्हणाले?
दरम्यान, 16 एप्रिलची नागपुरातील महाविकास आघाडीची सभा गर्दीचा उच्चांक गाठेल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यातील जनतेला आधाराचा शब्द देण्यासाठी सभा होत आहे. नागपुरात सभा होणार म्हणून काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काही लोक सभेला विरोध करत आहे. पण पूर्व विदर्भातून लाखोच्या संख्येत लोक सभेला येतील. संभाजीनगरच्या सभेला सुद्धा भाजपने विरोध केला होता. नागपुरात सुद्धा तसा प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीचा मुस्कटदाबी करण्याचं काम भाजपकडून नागपुरात होत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसंच कृष्णा खोपडे यांना आमच्या सभेत यायचं असल्यास आम्ही त्यांच्यासाठी सोफ्याची व्यवस्था करू, असा टोलाही राऊत यांनी हाणला.
ADVERTISEMENT