प्रताप सरनाईकांचा बंगला भाजपच्या राज्यमंत्र्याना! सरकारी बंगला काढला की बदलून दिला? महायुतीत चाललंय तरी काय?

Pratap Sarnaik Bungalow: शिवसेना कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांचा मलबार हिल येथील बंगला शासनाने काढून भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Mumbai Tak

रोहित गोळे

20 Jan 2025 (अपडेटेड: 21 Jan 2025, 12:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रताप सरनाईक यांचा मलबार हिल येथील बंगला शासनाने काढून मेघना बोर्डीकरांना दिला

point

मंत्री प्रताप सरनाईक यांना शासकीय निवासस्थान म्हणून चर्चगेट येथील फ्लॅट देण्यात आला

point

सत्ताधारी महायुतीत बरीच धुसफूस सुरू

Pratap Sarnaik and Meghna Bordikar: मुंबई: सत्तास्थापनेपासून महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सातत्याने धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय ताजा असताना आता चक्क शिवसेनेच्या एका कॅबिनेट मंत्र्याचा बंगला काढून भाजपच्या राज्यमंत्र्याला देण्यात आला आहे. त्यामुळे आता नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (bungalow of a shiv sena cabinet minister pratap sarnaik was taken away and given to a bjp minister of state meghna bordikar what is going on in the mahayuti)

हे वाचलं का?

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांना सुरुवातीला मलबार हिल येथील अवंती-5 हा बंगला देण्यात आला होता. पण आता त्याऐवजी त्यांना चर्चगेट येथील सुरूची - 18 हे शासकीय निवासस्थान देण्यात आलं आहे.

हे ही वाचा>> फडणवीस सरकारवर मोठी नामुष्की, महाजन-तटकरेंना मोठा धक्का.. पालकमंत्री पदाला स्थगिती

तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांचाच बंगला हा भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना देण्यात आला आहे. 

प्रताप सरनाईकांचा 'तो' बंगला काढून घेतला

सुरुवातीला जेव्हा मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले होते. तेव्हा प्रताप सरनाईक यांना मलबार हिल येथील अवंती-5 या बंगल्याचे वाटप करण्यात आले होते. पण आता तो बंगला काढून त्याऐवजी त्यांना सुरूची - 18 या शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आलं आहे.

कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक (फोटो सौजन्य: Facebook)

हे ही वाचा>> Dhananjay Munde: 'दादांना सांगितलेलं, पहाटेची शपथ घेऊ नका घात होतोय..', मुंडेंकडून गौप्यस्फोट

पाहा याबाबतचा नेमका शासन निर्णय


मेघना बोर्डीकरांना लॉटरी, थेट मिळाला मलबार हिलवरील बंगला

दरम्यान, कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांचा जो मलबार हिलवरचा बंगला शासनाने काढून घेतला तो चक्क भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना देण्यात आला आहे. आधी मेघना बोर्डीकर यांना चर्चगेट येथील सुनिती - 6 हे शासकीय निवासस्थान देण्यात आलं होतं. पण आता मात्र त्यांना मलबार हिलवरील बंगला मिळाला आहे.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (फोटो सौजन्य: फेसबुक)

पाहा याबाबतचा शासन निर्णय


दरम्यान, कॅबिनेट मंत्र्याचा बंगला काढून थेट राज्यमंत्र्याला देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेत मात्र नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

 

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयाकडून बंगला वाटपाबाबत नेमका खुलासा

दरम्यान, मुंबई Tak ने दिलेल्या वृत्ताबाबत भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. 

मेघना बोर्डीकरांच्या कार्यालयाकडून जो खुलासा करण्यात आला आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'मा. प्रताप सरनाईक, मंत्री परिवहन यांना 23.1.2025 च्या आदेशान्वये अवंती-5 ही सदनिका वाटप करण्यात आली होती. प्रतापजी सरनाईक, मंत्री परिवहन यांनी त्यांचे वैयक्तिक कारणासाठी त्यांना वाटप करण्यात आलेली सदनिका बदलून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रतापजी सरनाईक यांचे विनंतीनुसार, सुरूची-18 ही सदनिका नव्याने वाटप करण्यात आलेली आहे. यामुळे रिक्त झालेली अवंती-5 ही सदनिका राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना वाटप करण्यात आलेली आहे. मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी विनंती केल्यानुसार त्यांची सदनिका बदलण्यात आली आहे. यामुळे कॅबिनेट मंत्री यांची सदनिका काढून राज्यमंत्री यांना देण्यात आली ही बातमी वस्तुस्थितीनुसार नाही.'

शासकीय पत्रकात प्रताप सरनाईकांनी विनंती केल्याचा उल्लेख नाही! 

दरम्यान, मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयाकडून जो खुलासा करण्यात आला आहे त्यात असं म्हटलं आहे की, प्रताप सरनाईक यांनी विनंती केल्यामुळे त्यांना सदनिका बदलून देण्यात आली. मात्र, सामान्य प्रशासन विभागाकडून जे अधिकृत शासकीय पत्रक जारी करण्यात आलं त्यात कुठेही ही बाब नमूद करण्यात आली नव्हती की, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार त्यांचा बंगला हा बदलण्यात आलेला आहे.

 

 

    follow whatsapp