गुजरात भाजपच्या विजयाचे ‘चाणक्य’ सी. आर. पाटलांचं महाराष्ट्र कनेक्शन काय?

भाग्यश्री राऊत

09 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:36 AM)

C. R. Patil: मुंबई: गुजरातमध्ये भाजपला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळाल्या. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड भाजपनं मोडीत काढले. पण, या विजयात चर्चा होतेय, ती महाराष्ट्राच्या सी. आर. पाटलांची, त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटची. कारण, या निवडणुकात 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. तसेच मोदींनी जे 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट दिलं होतं, ते सी. आर. पाटलांनी […]

Mumbaitak
follow google news

C. R. Patil: मुंबई: गुजरातमध्ये भाजपला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळाल्या. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड भाजपनं मोडीत काढले. पण, या विजयात चर्चा होतेय, ती महाराष्ट्राच्या सी. आर. पाटलांची, त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटची. कारण, या निवडणुकात 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. तसेच मोदींनी जे 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट दिलं होतं, ते सी. आर. पाटलांनी सत्यात उतवरलं. पण, गुजरातमधल्या भाजपच्या विजयात मोठा वाटा असणारे हे सी. आर. पाटील कोण? त्यांचं महाराष्ट्रासोबत काय नातं आहे? हेच जाणून घेऊया सविस्तर. (chanakya of gujarat bjps victory c r patil what is maharashtra connection)

हे वाचलं का?

चंद्रकातं रघुनाथ पाटील म्हणजे सी. आर. पाटील. ते मूळचे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातले. पण, आधीपासून गुजरातमधल्या नवसारी इथं राहतात. त्यांचं शालेय शिक्षणही गुजरातमध्ये झालं. त्यांनी गुजरात पोलिसांमध्येही नोकरी केली. त्यांनी सरकारी नोकरी सोडली. त्यानंतर 1980 ला भाजपात प्रवेश केला. त्यानंतर 1995 पासून ते 2000 पर्यंत त्यांनी औद्यगिक विकास महामंडळाचं नेतृत्व केलं. त्यानंतर 2009 ला नवसारीचे खासदार म्हणून थेट लोकसभेत पोहोचले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा दणदणीत विजय झाला. गेल्या 2020 मध्ये सी. आर. पाटलांना गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. त्यांनी महत्वाचे निर्णय घेऊन पक्षसंघटना मजबूत केली.

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 : भाजपने दोन मंत्र्यांची खाती का काढून घेतली?

सी. आर. पाटील हे मोदी आणि शाह यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. सी. आर. पाटील टेकनिकली स्टाँग आहेतच. पण त्यांचं मॅनेजमेंटही चांगलं आहे. त्याचाच फायदा गुजरात निवडणुकीत झाला. भाजपनं गुजरात निवडणुकीसाठी जे मायक्रो मॅनेजमेंट केलं होतं, ती सर्व देणं सी. आर. पाटलांची आहे असं सांगितलं जातंय. याचं मोठं उदाहरण म्हणजे. पन्ना समिती, पन्ना प्रमुख.

आता ही पन्ना समिती आणि पन्ना प्रमुख ही काय भानगड आहे? तर, मतदान यादीत एक बाजूला 30 आणि दुसऱ्या बाजूला 30 असे 60 मतदारांची यादी असते. एका पानावर असलेल्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या पक्षाला मत द्या, असं सांगण ही पन्ना प्रमुखाची जबाबदारी असते. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपनं ही पन्ना प्रमुख संकल्पना आणली.

‘Aam Aadmi Party’ ची राष्ट्रीय राजकारणात दणक्यात एन्ट्री; गुजरात हरुनही मिळणार नवी ओळख

दुसरं म्हणजे पन्ना समिती. ही पन्ना समिती सी. आर. पाटलांची आयडिया असल्याचं भाजप नेते सांगतात. मिळालेल्या माहितीनुसार, पाच लोकांची एक अशी पन्ना समिती असते. भाजपला मत देण्यासाठी सांगणं, हेच या समितीचं काम असतं. गुजरात निवडणुकीत, 80 लाखांपेक्षा अधिक पन्ना समिती स्थापन करण्यात आल्या होत्या. त्याचाच फायदा भाजपला झाल्याचं बोललं जातं. सी. आर. पाटलांनी 2019 ला त्यांच्या नवसारी मतदारसंघात हा पन्ना समितीचा प्रयोग केला होता.

आता हाच प्रयोग गुजरात विधानसभा निवडणुकीत करण्यात आला. त्यामुळे त्यांना इतक्या जागा मिळाल्याचं बोललं जातं. यावरून आपल्याला लक्षात येईल की भाजपचं किती मायक्रो लेव्हलचं मॅनेजमेंट असतं.

याशिवाय, सी. आर. पाटलांनी कोरोना काळातही चांगलं काम केलं होतं. जी कोणी व्यक्ती भाजपच्या कार्यालयात येत होती, त्यांना ते मदत करायचे. त्यांच्या कामाचं गुजरातमध्ये कौतुक केलं जातं. इतकंच नाहीतर त्यांनी 2020 पासून गुजरातमध्ये वादळी दौरे केले आहेत.

या सगळ्या गोष्टींचा फायदा म्हणजे, त्यांच्यासमोर 150 पेक्षा अधिक जागा मिळवण्याचं जे टार्गेट होतं, ते त्यांना पूर्ण करता आलं. सी. आर. पाटील हे गुजरातच्या विजयाचे मराठी शिल्पकार आहेत, असं बोललं जातं.

    follow whatsapp