मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! मुंबईत 'या' वाहनांसाठी आज रात्रीपासून टोलमाफीचा निर्णय

मुंबई तक

14 Oct 2024 (अपडेटेड: 14 Oct 2024, 01:47 PM)

मुंबई : आज (14 ऑक्टोबर 2024) सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईकरांसाठी मोठी घोषणा करण्यात आली.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील 'या' 5 टोलनाक्यांवर कर आकारला जाणार नाही

point

शिंदे सरकारच्या या घोषणा महाविकास आघाडीसाठी चॅलेंजिंग ठरणार?

point

सरकारच्या निर्णयाआधी मनसेकडून टोलमाफीची अनेकदा मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. आज अनेक राजकीय मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर केल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत निवडणुकीआधीच शिंदे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. शिंदे सरकारने मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांवरील टोल हटवला आहे. (Chief Minister Eknath Shinde big announcement in cabinet meeting toll waiver decision for light motor vehicles in Mumbai from tonight)

हे वाचलं का?

आज (14 ऑक्टोबर 2024) सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईकरांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, आज रात्रीपासून मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर छोट्या आणि हलक्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

हेही वाचा : Gold Price : दसऱ्यानंतर खरंच सोनं महागलं? 10 ग्रॅम सोन्याचे भाव पाहा एका क्लिकवर

मुंबईतील 'या' 5 टोलनाक्यांवर कर आकारला जाणार नाही

  • दहिसर टोल नाका
  • मुलुंड टोल नाका
  • वाशी टोल नाका
  • ऐरोली टोल नाका
  • तिनहात नाका

शिंदे सरकारच्या या घोषणा महाविकास आघाडीसाठी चॅलेंजिंग ठरणार?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला चांगलं यश मिळालं नव्हतं. हे पाहता आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार धाडसी पावले उचलत आहे. लाडकी बहीण सारखी योजना राबवत असतानाच आता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. 

याचाच अर्थ निवडणुकीपूर्वी महायुती सरकार असे निर्णय घेत आहेत, ज्याचा परिणाम निवडणुकीत त्यांच्या बाजूने होऊ शकतो. हे पाऊल ओबीसी, महिला आणि एससी मतदारांना आकर्षित करण्याचा महाराष्ट्रातील शिंदे सरकारचा प्रयत्न आहे. आता महाविकास आघाडीला हे कसं चॅलेंजिंग ठरणार हे येणाऱ्या काळातच समजू शकेल.

हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात आज पावसाचा मूड काय? पाहा हवामान विभागाचा अंदाज

सरकारच्या निर्णयाआधी मनसेकडून टोलमाफीची अनेकदा मागणी

याआधी यासाठी मनसे पक्षाकडून महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईतील सर्व टोल माफ करण्यात यावे, यासाठी मनसेकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होते. या मुद्द्यासाठी अनेकदा राज ठाकरे यांनी आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली होती.

कोणत्या वाहनांना असणार टोलमाफी?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मात्र अटल सेतूसाठी हा नियम नसणार आहे. 

    follow whatsapp