Nanded Lok Sabha By Election 2024: नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान

मुंबई तक

15 Oct 2024 (अपडेटेड: 15 Oct 2024, 06:02 PM)

Nanded Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या अजस्त्र ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता

maharashtra-assembly-election-2024-nanded  lok  sabha by election date declare by election commision election is held on 20 november 2024  vasant chavan

नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर,

follow google news

बातम्या हायलाइट

point

नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर,

point

काॅग्रेस नेते वसंत चव्हाण यांचे निधन झाले होते

point

नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक 20 नोव्हेंबरला होणार

Nanded Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणूक ही एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर 2024 ला पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर 2024 ला लागणार आहे. या निवडणुकीसोबत आयोगाने नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकही जाहीर केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचं निधन झालं होतं. त्यामुळे आता निवडणुक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे नांदेडमध्ये 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक लागणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. (maharashtra-assembly-election-2024-nanded  lok  sabha by election date declare by election commision election is held on 20 november 2024 vasant chavan) 

हे वाचलं का?

काँग्रेस आमदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने नांदेडची जागा रिक्त झाल्याची माहिती 30 ऑगस्टलान केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवली होती. त्यामुळे नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये पोटनिवडणूक लागणार होती. त्यात निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीसोबत नांदेडची पोटनिवडणूक जाहीर करेल अशी चर्चा होती. तसेच झाले असून आता नांदेडची पोटनिवडणूकीसाठी मतदान हे 20 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. 

हे ही वाचा : 2024 Maharashtra Assembly Election Full Schedule: बिगुल वाजला! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, निकाल 'या' तारखेला

नांदेडमध्ये काँग्रेस आमदार वसंत चव्हाण यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारली होती. लोकसभेत प्रतापराव चिखलीकर यांना 4 लाख 69 हजार 452 मतं पडली होती. तर वसंत चव्हाण यांना 5  लाख 28 हजार 894 मतं पडली होती. त्यामुळे नांदेडमधून वसंत चव्हाण विजयी ठरले होते. या विजयानंतर  काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. 

दरम्यान वसंत चव्हाण यांच्या अचानक जाण्याने काँग्रेसला वसंत चव्हाण यांची गादी त्यांच्या चिरंजीवानेच चालवावी असे वाटत होते. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचा जिल्हा काँग्रेसने ठरावही संमत केला होता. भाजपमधून नांदेडच्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी काही नावे समोर येत असून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणारी याकडे सर्वांचे लक्ष आहे.

    follow whatsapp