Ajit Pawar : "लाडकी बहीण योजना तात्पुरती नाही...", अजित पवारांनी महिलांना दिली आनंदाची बातमी

मुंबई तक

16 Oct 2024 (अपडेटेड: 16 Oct 2024, 02:42 PM)

Ajit Pawar On Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे.

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana

Ajit Pawar latest News Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

point

अजित पवारांनी राज्यातील महिलांना दिला मोठा दिलासा, नेमकं काय म्हणाले?

point

लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरु राहील?

Ajit Pawar On Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. परंतु, महायुती सरकारने ही योजना सुरु केल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह इतर विरोक्षी पक्ष राज्य सरकारवर टीका करत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. पवारांनी पत्रकार परिषेदत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करतानाच राज्यातील महिलांना मोठा दिलासा दिला. 

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले? 

"जनतेचं जीवन बदलण्याच्या योजना खऱ्या अर्थाने आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या योजनांना मिळणारा प्रतिसाद बघून आमचे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. काही जण म्हणतात घाबरलेले आहेत. पण मी तसं नाही म्हणणार, ते गडबडलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळं ते गडबडून गेले आहेत" असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

हे ही वाचा >> Eknath Shinde : "लाडक्या बहिणींना टच कराल, तर...", CM एकनाथ शिंदेंनी दिला मोठा इशारा

अजित पवार पुढे म्हणाले, "आम्ही ही योजना जेव्हा जाहीर केली, तेव्हा या योजनेची अंमलबजावणी होणारच नाही, असं ते म्हणायचे. अर्ज भरले जातील, पण पैसेच देणार नाही, अशी टीका आमच्यावर केली. अडीच कोटी माय माऊलींच्या खात्यात पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. त्यांच्या अर्जानुसार पत्येकी साडेसात हजार रुपये जमा झालेत. विरोधकांच्या बहिणींच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल हा पचनी पडत नाही. म्हणून ते सांगतात हे पैसे फक्त निवडणूक होईपर्यंत मिळतील. 

हे ही वाचा >> Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे 'YouTube' कनेक्शन! मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

 "मी आपल्याला अतिशय जबाबदारीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की यामध्ये पहल्यांदा दहा हजार कोटींची तरतूद केली होती. नंतर पसतीस हजार कोटींची केली. अशापद्धतीने वर्षभरासाठी एकूण पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद केली. महाराष्ट्रातील सर्व माय माऊलिंना मला खात्री द्यायची आहे की ही योजना तात्पुरती नाही. निवडणूका येतील आणि निवडणूका जातील, हे तर पाच वर्षांनी ठरलेलंच आहे. तुमचे ते पैसे आहेत. तुमचा अधिका कुणी काढू शकत नाही, असंही अजित पवार म्हणाले. 

    follow whatsapp