Baba Siddique Death Case Update : सौरभ वक्तानिया/ दिपेश त्रिपाठी/ मुस्तफा शेख मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता नवीन नवीन खुलासे समोर येत आहे. त्यात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. सलमान खान आधीच बिश्नाई गँगच्या टार्गेटवर होता. त्यामुळे सलमानच्या जवळीकतेमुळे बाबा सिद्दीकींचा गेम झाल्याचं बोललं जातयं. पण सलमान तर फक्त मोहरा आहे, या हत्येमागचं मुळ कारण वेगळचं आहे. ते कारण म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मायानगरी मुंबईवर राज्य करायचं आहे. मुंबईवर त्याला कंट्रोल हवाय, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचच्या चार्जशीटमधून समोर आली आहे. (baba siddique case inside story gangster lawrence bishnoi mumbai police salman khan bollywood actor)
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 14 जुलै 2024 ला मुंबईच्या मोक्का न्यायालयात 1736 पानी चार्जशीट दाखल केली होती. ही चार्जशीट सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणी होती. या चार्जशीटमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह 9 जणांना आरोपी बनवलं होतं. याच चार्जशीटमध्ये एक मोठी माहिती देण्यात आली होती. सलमानला धमकी हे फक्त निमित्त आहे. वास्तविक लॉरेन्सला संपूर्ण मुंबईवर राज्य करायचे आहे. त्याला मुंबई अंडरवर्ल्डवर कंट्रोल हवाय. असं जरी असलं तरी बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर दोन प्रश्न
उपस्थित होतायत. पहिलं म्हणजे, या हत्येमागे लॉरेन्स गँगचा हात आहे का? आणि जर लॉरेन्स गँगचा हात असेल तर बाबा सिद्दीकी यांनाच का टार्गेट करण्यात आले?
हे ही वाचा : Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी हत्येबाबत प्रचंड मोठा खुलासा, नवी माहिती आली समोर...
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 6 जणांची ओळख पटवली आहे. गुरमेल सिंग, शिवकुमार गौतम, धरमराज कश्यप, झिशान अख्तर, प्रवीण लोणकर आणि शुभम उर्फ शुबू लोणकर अशी त्यांची नावे आहेत. यापैकी गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर हे तिघे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर उर्वरित तिघे म्हणजे झिशान, शिवकुमार आणि शुभम फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान समोर आलेली कहाणी अशी आहे की, पंजाबमधील जालंधर येथील शकर गावचा रहिवासी असलेला झिशान अख्तर खून आणि दरोड्याच्या एका गुन्ह्यात पटियाला तुरुंगात बंद होता. झिशानची स्वतःची एक टोळी आहे. तो 2022 ते जून 2024 पर्यंत पटियाला तुरुंगात होता. येथेच त्याची लॉरेन्स गँगच्या काही मेंबरशी भेट झाली. याशिवाय तुरुंगात असताना त्यांनी गुरमेल सिंग याचीही भेट घेतली होती. जो आपल्या मोठ्या भावाच्या हत्येप्रकरणी त्याच तुरूंगात शिक्षा भोगत होता. त्यानंतर 7 जून रोजी झिशान जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. याच दरम्यान, गुरमेलही जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर झिशानने कैथल येथील गुरमेलच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर तो मुंबईत आला होता.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई टोळीशी भेट झाल्यानंतर झिशानला टार्गेटने मेसेज देण्यात आला होता. हा टार्गेट बाबा सिद्दीकी होता. आता झिशानला फक्त शार्पशूटरची व्यवस्था करायची होती. आता लॉरेन्स गँगच्या कामाची पद्धत पाहता. अशा शूटर्सची निवड केली जाणार होती ज्यांची कोणतीही मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही किंवा ते शूटरच नाहीत. त्यामुळे शुटरच्या शोध घेण्यासाठी झिशानने पुणे गाठले.
हे ही वाचा : Baba Siddique : बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्यांची सगळी कुंडलीच आली बाहेर, एक तर भंगारवाला...
पुण्यात झिशानची भेट शुभम उर्फ शुबू लोणकरशी झाली, जो आधीपासूनच लॉरेन्स गँगसाठी काम करत होता. पुण्यात त्यांची स्वतःची डेअरी आहे. त्याच्या शेजारीच भंगाराचे दुकान होते. या दुकानात यूपीच्या बहराइच येथून आलेले धर्मराज कश्यप आणि शिवकुमार हे काम करायचे.
शुभमने दोघांना पैशाचे आमिष दाखवून या कामासाठी तयार केले. आता हँडलर झिशानकडे तीन शूटर होते. गुरमेल, धरमराज आणि शिवकुमार. झिशाननेच या तिघांच्या मुंबईत राहण्याची व्यवस्था केली होती. मुंबईतील कुर्ला परिसरात 14 हजार रुपयांना भाड्याने फ्लॅट घेतला. हे तिघेही येथे राहत होते. हा फ्लॅट 2 सप्टेंबर रोजी भाड्याने घेतला होता. मुंबईत आल्यानंतर आता तिघांनाही एकच काम होतं. वांद्रे पूर्वेला बाबा सिद्दीकी यांची रेकी करणे? ते केव्हा आणि कुठे जातात हे शोधणे. कोणाला भेटतात? घरी कधी असतात? मुलगा झिशान सिद्दिकीच्या ऑफिसमध्ये कधी जातात? हे तिघे नेहमी कुर्ल्याहून ऑटोने वांद्रे येथे येत असत. मग बाबा दिवसभर सिद्दिकीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचे.
गुरमेल आणि धर्मराज यांच्याकडून दोन मोबाईलही सापडले होते. यातील एक कॉलिंग मोबाईल होता, तर दुस-या मोबाईलमधून मुंबई समुद्रकिनारी फिरतानाचे फोटोही सापडले आहेत. रेकी केल्यानंतर दसऱ्याचा दिवस निवडण्यात आला. कारण बाबा सिद्दीकी यांना त्या दिवशी मूर्ती विसर्जन आणि गरबा कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. अशाच एका गरबा कार्यक्रमातून ते त्यांचा मुलगा झीशानच्या कार्यालयात परतले होते. हे तिघेही बाबा सिद्दिकीचा सतत पाठलाग करत होते. तिघांकडे पिस्तूल होते. मात्र गुरमेल सिंग यांनीच बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला. त्याने 6 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 3 गोळ्या सिद्दीकींना लागल्या. त्या दिवशीही तिघेही ऑटोने आले होते. त्याचा चेहरा रुमालाने झाकलेला होता आणि गोळी झाडण्यापूर्वी त्याने शेजारी उभ्या असलेल्या रक्षकांवर मिरचीचा स्प्रे फेकला होता.
या घटनेनंतर गुरमेल सिंग आणि धरमराज कश्यप यांना घटनास्थळीच अटक करण्यात आली होती, तर शिवकुमार पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी शुभू लोणकर महाराष्ट्र या नावाने ही पोस्ट टाकण्यात आली होती. ज्यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याचा दावा करण्यात आला होता.
ADVERTISEMENT