Dahisar Firing: ठाकरेंनी गमावला ढाण्या वाघ.. अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू

मुंबई तक

• 11:41 PM • 08 Feb 2024

Abhishek Ghosalkar Death: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.

अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू

Abhishek_Ghosalkar_Death

follow google news

बातम्या हायलाइट

point

अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू

point

ठाकरे गटाने गमावला तरूण नेता

point

गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा दुर्दैवी मृत्यू

Abhishek Ghosalkar Kill: शिवशंकर तिवारी, मुंबई: दहिसर येथील गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र हादरला आहे. दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत दुर्दैवाने अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गोळीबार करणारा आरोपी मॉरिस भाई याने देखील त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. त्याला रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले. (dahisar firing uddhav thackeray lost a fighting leader shiv sena ex corporator abhishek ghosalkar died in firing)

हे वाचलं का?

दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्यांना तातडीने दहिसर येथील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. परस्पर वादातून हा गोळीबार करण्यात आला अशी माहिती जवळच्या नातेवाईकांकडून मिळत आहे. सध्या पोलीस घटनास्थळी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

...म्हणून मॉरिसने झाडल्या अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या?

आरोपी मॉरिस भाई या नावाने दहिसर परिसरात ओळखला जात होता आणि तो एक सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगत होता. वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी MHB पोलीस ठाण्यात मॉरिसविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. एका महिलेने मॉरिसविरोधात बलात्काराची तक्रारी दिली होती. मॉरिसच्या मते, अभिषेक घोसाळकर यांच्या सांगण्यावरूनच  महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा>> Abhishek Ghosalkar: ठाकरेंच्या नेत्यावर बेछूट गोळीबार

काही काळापूर्वी दोघांमध्ये याबाबत समेट देखील झाला होता. मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर या दोघांची बोरिवली आयसी कॉलनीत समोरासमोर कार्यालये आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली होती. त्यानंतर आज (8 फेब्रुवारी) मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमाचं आमंत्रण देऊन स्वत:च्या कार्यालयात बोलावून घेतले आणि फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

Facbook Live सुरु असतानाच अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार 

मिळालेल्या माहितीनुसार, मारेकरी मॉरिस याने एका कार्यक्रमानिमित्त अभिषेक घोसाळकर यांना त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं. जिथे सुरुवातीला मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह सुरू करून त्यांच्या कार्यक्रमाविषयी दोन शब्द बोलण्यास सांगितलं.

हे ही वाचा>> अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिस भाई कोण?

मॉरिस हा अभिषेक घोसाळकरांच्या परिचयाचा असल्याने ते देखील कार्यालयात आले. परिसरातील कार्यक्रमासाठी आलेल्या अभिषेक घोसाळकर यांनी देखील अगदी हसत-खेळत फेसबुक लाईव्हवर बोलण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाविषयी काही मिनिटं बोलल्यानंतर अभिषेक घोसाळकर हे खुर्चीतून जसे उठले त्याच क्षणी मॉरिसने आपल्याजवळील बंदूक काढून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

काही क्षण नेमकं काय झालं हे अभिषेक घोसाळकर यांना कळलं नाही. मात्र, दोन गोळ्या लागताच अभिषेक यांनी मॉरिसच्या दिशेने धाव घेतली. मात्र, मॉरिसने त्यांच्यावर आणखी एक गोळी झाडली. 

    follow whatsapp