NCP: ‘जयंत पाटील.. पुण्यात अमित शाहांना भेटले?’, अजित पवारांचं मोठं विधान

मुंबई तक

07 Aug 2023 (अपडेटेड: 07 Aug 2023, 02:30 PM)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना भेटल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

dcm ajit pawar said jayant patil naver meeting with amit shah big statement on ncp politics maharashtra political news in marathi

dcm ajit pawar said jayant patil naver meeting with amit shah big statement on ncp politics maharashtra political news in marathi

follow google news

Ajit Pawar on Jayant Patil: कृष्णा पांचाळ, पुणे: अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासोबत अनेक दिग्गज नेत्यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. पण यावेळी काही मोजकेच नेते आणि आमदार हे शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असल्याचं दिसून आलं. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा समावेश आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान समजले जातात. मात्र, हे जयंत पाटील आता अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची प्रचंड जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्याबाबत आता स्वत: अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ते पुण्यात बोलत होते. (dcm ajit pawar said jayant patil naver meeting with amit shah big statement on ncp politics maharashtra political news in marathi)

हे वाचलं का?

जयंत पाटलांबाबत अजित पवारांचं मोठं विधान

पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीबद्दल चर्चा झाली. पण जयंत पाटील भेटले हे धादांत खोटं आहे. ते शरद पवार यांच्याकडे होते. ते भेटले तर सांगितलं असतं, पण ते भेटलेच नाहीत. कारण तसं नसताना बिनबुडाच्या बातम्या का करता?, मी काही मनकवडा नाही.. मी त्यांच्या मनातलं कसं काय सांगू शकतो?’ असं थेट अजित पवार यावेळी म्हणाले.

जयंत पाटील खरंच अमित शाहांना भेटले का?

दोनच दिवसांपूर्वी असं वृत्त समोर आलं की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वृत्तानंतर जयंत पाटील हे आता शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत, अशी चर्चाही सुरू झाली.

हे ही वाचा >> अमित शाह पुण्यात आल्यानंतर अजित पवारांनी काय केलं कौतुक?

झालं असं की पावसाळी अधिवेशन झालं. त्यानंतर एका चर्चेने डोकं वर काढलं. चर्चा अशी सुरू झाली की, पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अजित पवारांसोबत जाणार. नंतर असे वृत्त समोर आलं की जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार.

या सगळ्यात केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे पुण्यात आले. त्यानंतर या चर्चेला जास्तच हवा मिळाली. कारण, जयंत पाटील यांनी जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये अमित शाहांची भेट घेतल्याचं म्हटलं गेलं. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनीच ही भेट घडवून आणि देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना फोन करून बोलवून घेतल्याचं बोललं गेलं. जयंत पाटील हे आमदार सुमन पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

जयंत पाटील म्हणाले, मी तर…

अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, “माझ्याविषयी गैरसमज पसरवू नका. मी शाहांना भेटलो याचे काही पुरावे आहेत का? मी संध्याकाळी आणि आज सकाळी पवारसाहेबांसोबत होतो. रात्री दीड वाजेपर्यंत अनिल देशमुख, राजेश टोपेंसोबत बैठकीत होतो. हे माझ्यासाठी मनोरंजन आहे.”

हे ही वाचा >> जयंत पाटलांना भाजपची ऑफर? जितेंद्र आव्हाड म्हणाले…”सत्ता येते जाते”

“मी माझ्याच घरी आहे. तुम्हीच बातम्या करतायत, तुम्हीच खुलासे करा. आमच्या पक्षवाढीसाठी बैठका सुरू आहेत. माझ्यावर कुणाचा दबाव नाही. मला कुणी सांगितलेले नाही किंवा मी असं काही बोललेलो नाही. कुणाशीच चर्चा झालेली नाही. मी दररोज पवारसाहेबांना भेटतोय. माझी रोज करमणूक सुरू आहे. त्यात काल दुपारी भर पडली. आज सुरू आहे. महाराष्ट्रात माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी आहे. हे योग्य नाही”

“मी आता पार्टी ऑफिसला चाललोय. मी कुणालाच भेटलेलो नाही. पवारांसोबत राहणार शेवटपर्यंत? हेा काय विचारायचा प्रश्न आहे. मी साहेबांसोबतच आहे. गैरसमज पसरवू नका. बार-बार मत गलतफहमी मत करो. घरी बसून बातम्या पसरवू नका. महाराष्ट्रातील जनता मला ओळखून आहे”, असं म्हणत जयंत पाटलांनी ते भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा बिनबुडाची असल्याचा दावा केला आहे.

    follow whatsapp