मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेनंतर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राजकीय भूमिकांवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या विश्वासार्हतेवर भाष्य केलं. एवढंच नव्हे तर थेच असंही म्हटलं की, अनेक लोकांना धोका देणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा?
ADVERTISEMENT
एकीकडे राज ठाकरे हे आपली किरकोळ भांडणं आहेत. तर उद्धव ठाकरे ती भांडणं मिटवायला तयार आहोत असं म्हणत असतानाच दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र, टीकात्मक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
युतीच चर्चा सुरू होत नाही तोवर संदीप देशपांडेंनी टीकाच केली सुरू
1. उद्धव ठाकरेंच्या भूतकाळातील वक्तव्य आणि कृतींवर टीका:
संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 2017 च्या वक्तव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "तुम्ही स्वतः म्हणालात की तुम्ही 25 वर्षे युतीत सडलात, मग 2019 मध्ये पुन्हा त्यांच्यासोबत का गेलात? तुमच्या बोलण्यात आणि कृतीत तफावत का?"
हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी: 'भांडण मिटवून टाकलं...', उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी तयार!
2. काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबतच्या युतीवर प्रश्न:
देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या राजकीय युतीवरही बोट ठेवलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी (शरदचंद्र पवार गट) हातमिळवणी केली. देशपांडे यांनी यावर आक्षेप घेत 2008 च्या मराठी भाषा आंदोलनाचा दाखला दिला. ते म्हणाले, "2008 मध्ये मराठी भाषेच्या आंदोलनासाठी मनसे कार्यकर्त्यांवर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या सरकारने गुन्हे दाखल केले. त्या काँग्रेसला तुम्ही आता कसे महाराष्ट्रप्रेमी म्हणता? त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं, पण तुम्ही त्यांच्यासोबत आता आनंदाने फिरत आहात."
3. युतीबाबतची नैतिकता आणि कार्यकर्त्यांचा प्रश्न:
देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या निर्णयांवर नैतिक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, "जर आम्ही (मनसे) भाजप किंवा एकनाथ शिंदे गटासोबत गेलो, तर तुम्ही आम्हाला वाईट ठरवता. पण तुम्ही काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत गेलात, ते योग्य कसं? तुमच्या आणि आमच्या कृतींमध्ये हा फरक का?. असा सवालही देशपांडेंनी यावेळी विचारला.
हे ही वाचा>> उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान! म्हणाले, "आमच्यातील भांडण किरकोळ..."
4. राज ठाकरे यांच्यावर विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या भावना:
संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं की, युतीचा अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील. ते म्हणाले, "राज ठाकरे हेच आमचे नेते आहेत, आणि युतीबाबतचा निर्णय त्यांचाच असेल. पण एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आमच्या मनातील भावना व्यक्त करतोय. आम्ही राज ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, पण उद्धव ठाकरे यांच्या कृती आणि वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे."
5. उद्धव ठाकरेंच्या मराठी माणसाच्या मुद्द्यावर प्रश्न:
देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या मुद्द्यावरही टीका केली. ते म्हणाले, "तुम्ही मराठी माणसाच्या नावाने राजकारण करता, पण ज्या पक्षांनी मराठी माणसावर अन्याय केला, त्यांच्यासोबत तुम्ही आता कसे काय आहात? मनसेने नेहमीच मराठी माणसासाठी लढा दिला, पण तुमच्या कृती या बोलण्याशी जुळत नाहीत."
उद्धव ठाकरेंना एवढ्या लोकांना धोका दिलाय, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?
'तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही तो महाराष्ट्रद्रोही. पण आम्हाला तुम्ही जे सांगता आहात की, यांच्याबरोबर बोलू नका.. मग या अटी, मग शिंदेसोबत बोलायचं नाही. कारण त्यांनी शिवसेना फोडली.. माझा एक सरळ सोपा प्रश्न आहे. आतापर्यंत मी सगळं सांगितलं 2014, 2017, 2019 सगळे सांगितले..ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला. जो आम्ही खाल्लाय. ज्या लोकांनी भाजपला धोका दिला कारण त्यांच्यासोबत निवडणूक लढवून ते दुसरीकडे गेले.'
'आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तो कोणत्या मुद्यावर ठेवायच्या हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो.'
'बाकी युती करायची, नाही करायची हा सर्वस्वी निर्णय राज साहेब करतील. पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता हे सगळं राजकारण बघत असतो तेव्हा त्याला याबाबत विश्वास वाटणं कठीण आहे.' अशी थेट टीकाच संदीप देशपांडेंनी यावेळी केली आहे.
ADVERTISEMENT
