Sanjay Raut: 'काय झाडी, काय डोंगर म्हणणाऱ्यांना झाडाच्या मुळाखाली गाडू', ठाकरेंसमोरच राऊतांनी...

मुंबई तक

18 Oct 2024 (अपडेटेड: 18 Oct 2024, 05:22 PM)

Deepak Salunkhe Joins Shiv Sena : सांगोल्यातील अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला.

Deepak Salunkhe

Deepak Salunkhe

follow google news

बातम्या हायलाइट

point

दीपक साळुंखे आणि राजन तेली शिवसेनेत

point

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश

point

प्रवेशावेळी ठाकरेंचा शाहाजीबापूंवर निशाणा

Deepak Salunkhe Joins Shiv Sena मुंबई : दीपक साळुंखे आणि राजन तेली या दोन नेत्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे सांगोल्यात राजकारण ढवळून निघालं आहेत. दीपक साळुंखे यांचं राजकारण आम्ही वर्षानुवर्ष जवळून पाहतोय, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, दीपकआबा आमदार म्हणून विजयी होतीलच पण पुढेही उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दल चांगला निर्णय घेतील असं संजय राऊत म्हणाले. (Deepak Salunkhe and rajan patil joins shiv sena uddhav thackeray Sanjay Raut targets Shahajibapu Patil)

हे वाचलं का?

सांगोल्यातील गद्दाराच्या छाताडावर हातात मशाल घेऊन, पाय रोवून विजयी होण्याच्या मार्गावर असलेले दीपक आबा शिवसेनेत आले असं म्हणत राऊतांनी दीपक साळुंखे यांचं पक्षात स्वागत केलं. ज्यांना महाराष्ट्रातली झाडं, डोंगर दिसली नाहीत, त्यांना त्या झाडांच्या मुळाखाली आपल्याला गाडायचं आहे असं म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता शाहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: 'मशालीचे चटके कुणाला द्यायचे?', अ‍ॅन्जिओप्लास्टीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले

दीपक साळुंखे यांच्यासारखा माणूस आज उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत आला, त्यामुळे त्यांना त्यांच्या या निर्णयाचा गर्व वाटेल असा निर्णय उद्धव ठाकरे भविष्यात घेतील. आमदार म्हणून दीपक साळुंखे विजयी होतीलच, पुढे नेतृत्व करण्याची क्षमता दीपकआबांमध्ये असल्याचं म्हणत संजय राऊत यांना सूचक वक्तव्य केलं. 

रुग्णालयातून बाहेर पडल्यावर पहिल्यांदाच बोलले उद्धव ठाकरे 

हे ही वाचा >> Ladki Bahin Free Gas Cylinder: लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट, मोफत सिलेंडर मिळणार!

उद्धव ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांचं शिवसेनेत स्वागत केलं. यावेळी ते म्हणाले की, डॉक्टरांनी आराम करायला सांगितला, मात्र आम्हाला आधी हाराम्यांना घावलायचंय. दीपकआबा तुमच्या हातात आम्ही मशाला दिली आहे. ही मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवा असा म्हणत टोला मारला. यावेळी मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांना मैदानात उतरण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. तसंच सांगोल्यातील आमदार गद्दार निघाला तरी तुम्ही सांगोलेकर माझ्यासोबत आहात हे तुम्ही दाखवून द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

    follow whatsapp